Latest

Pune pmpml News : पुण्यात पुन्हा संतोष माने अवतरला; पीएमपी ड्रायव्हरने रागाच्या भरात उडवल्या गाड्या

अमृता चौगुले

पुणे : पुण्यात पीएमपी बसच्या सतत घटना घडत असतात. त्यातच आज एका पीएमपी बस चालकाने संतोष माने घटनेची पुनरावृत्ती केली आहे. पीएमपी ड्रायव्हरने दारुच्या नशेत रस्त्यावरील गाड्या उडवल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जेडब्ल्यू मॅरियट जवळ घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी घडली नाही. दरम्यान सदर बस चालकास चतुःशृंगी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की, कोथरूड डेपोची भाडेतत्त्वावरील बस क्रमांक TT33 मार्ग क्रमांक 276/13 चालक क्रमांक K640 निलेश ज्ञानेश्वर सावंत हे बस एनडीए गेट ते चिंचवड या मार्गाने जात असताना रत्ना हॉस्पिटल येथे वेडी वाकडी बस चालवली. यामुळे एका कारला बस घासून गेल्याने कार चालकाने पुढील चौकात विचारणा केली. या घटनेत बस चालक आणि कर ड्रायवर यांच्यात शाब्दिक वाद झाला.

याच कारणावरून बस चालकाने भर चौकात राग मनात धरून रस्त्यावरील वाहनांचा कोणताही विचार न करता, बस अचानक चौकातून पाठीमागे रिव्हर्स घेऊन वाहने उडवली. पुन्हा बस पुढे चौकापर्यंत घेऊन गेला. या सर्व प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये घबराट झाली. घाबरलेल्या प्रवाशांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. चतुःशृंगी पोलिसांनी बससह चालकाला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ताबडतोब कामावरून कमी केल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT