shriya saran-Pulkit Samrat 
Latest

Pulkit Samrat : पुलकित सम्राटने श्रिया सरनचा ड्रेस असा सावरला; नाही तर अनर्थ…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत नुकत्याच झालेल्या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अभिनेता पुलकित सम्राटने (Pulkit Samrat) श्रिया सरनला तिच्या ड्रेसच्या लांब ट्रेल सावरण्यास मदत केली. ही खास गोष्ट अनेकांनी कॅमेरात टिपली आणि या एका गोष्टीने पुलकितने प्रेक्षकांची मन जिंकली.  (Pulkit Samrat)

पुलकित सम्राटचे अलिकडेच झालेल्या स्टाईल अॅवॉर्ड्समध्ये त्याच्या शौर्याबद्दल कौतुक करण्यात आले. त्याची मैत्रीण अभिनेत्री श्रिया सरनला त्याने अशी मदत केली की, सगळीकडे त्याची वाह व्वा झाली. तिच्या स्टिलेटो हिल्स (Stiletto heel) खाली तिचा ड्रेस अडकला. हे पाहून पुलकित सम्राट तिच्या मदतीसाठी धावला. या खास गोष्टीसाठी सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं.

सरन रेड कार्पेटवर तिचा ड्रेस सावरत असताना सम्राटने आपला हात देऊ केला आणि तिला स्वीपिंग ट्रेल नीट करण्यात मदत केली. मीडियाने तो क्षण कॅमेऱ्यात कैद केल्याने सरनने हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली. व्हिडिओ प्रकाशित होताच, सम्राटच्या चाहत्यांनी अभिनेत्याचे कौतुक केलं आणि त्याला "संस्कारी सम्राट" असे संबोधले. सोशल मीडियावर या व्हिडिओचे खूप कौतुक झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT