पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेत रविवारी (दि.१०) भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. स्पर्धेतील सुपर फोरमधील हा पहिला सामना आहे. या सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam ) याने आपल्या वेगवान गोलंदाजांवर विश्वास व्यक्त केला आहे.
यावेळी बाबर म्हणाला की, "मला माझ्या मला माझ्या वेगवान गोलंदाजांचा अभिमान आहे. त्यांच्यामुळेच आम्ही सर्वांवर वर्चस्व गाजवतो. मोठे सामने आणि स्पर्धा वेगवान गोलंदाज जिंकून देतात यावर माझा विश्वास आहे. त्यांचा स्वत:वर विश्वास आहे. संघातील सर्व वेगवान गोलंदाज एकमेकांना सहकार्य करतात."
आम्ही प्रथम गोलंदाजी घेतली तर चांगली सुरुवात करतो. तसेच मधल्या षटकांचाही सदुपयोग करण्याचा प्रयत्न करतो. बांगलादेशविरुद्ध सामन्यात आम्ही अष्टपैलू खेळाडूला संधी दिली होती. आम्हाला सर्वात जास्त काय अनुकूल आहे ते शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या सर्व सामन्यांमध्ये, आम्ही आमच्या वेगवान गोलंदाजीसह खरोखरच चांगली कामगिरी करत आहोत. आम्ही एक संघ म्हणून खरोखर चांगले खेळत आहोत, असे ते म्हणाले. .
नियंत्रण ठेवू शकतो अशा गोष्टींवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. मागील चार दिवस येथे पाऊस पडला. रविवारी पावसाचा व्यत्यय येणार नाही, अशी आशा आहे. पण आमच्या क्षमतेनुसार जो काही वेळ मिळेल त्याचा सदुपयोग करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही अडीच महिन्यांहून अधिक काळ क्रिकेट खेळत आहोत. आम्हाला आमच्या खेळाडूंची काळजी घ्यावी लागेल, कारण तिथे एकमेकाचे सामने आणि प्रवास होत आहेत. खेळाडू अधिक तणावरहित ठेवण्यावर आमचा भर आहे, असेही त्याने नमूद केले.
हेही वाचा :