पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खान सध्या जवान चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवान चित्रपटाचे एखाद्या सीनचे व्हिडिओ लीक होतात तर कुठे फोटो लीक होतात. आता चित्रपट निर्मात्यांनी जवनाची टीजर रिलीज डेटचा खुलासा केला आहे.
शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा टीझर ७ जुलै किंवा १५ जुलैला रिलीज करण्यात येईल. निर्मात्यांनी गोषणा केल्यानंतर फॅन्सची उत्सुकता वाढली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या रिलीजच्या दोन महिने आधी याचे प्रोमोशन सुरू होणार आहे.
शाहरुख आणि चित्रपट दिग्दर्शक एटली मोठ्या स्तरावर लॉन्च करणार आहे. म्हटलं जात आहे की, भव्य स्तरावर प्रेक्षकांनी आतापर्यंत कोणत्याही बॉलीवूड चित्रपटाचा टीजर लॉन्च होताना पाहिलं नसेल. यामधील शाहरुखचा नवा अवतार पाहून प्रेक्षकांना धक्का बसेल.
शाहरुख खान सलमान खानच्या टायगर ३ चित्रपटात कॅमियो भूमिका करताना दिसणार आहेत. या चित्रपटात शाहरुखचा ॲक्शन अवतार दिसेल.