पुढारी ऑनलाईन : उन्हाने त्रस्त झालेल्या पुणेकरांची सकाळ मात्र आज अतिशय सुखद ठरली. इतके दिवस उकड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना आज सकाळी सकाळी अगदी थोड्याशाच पावसाने दिलासा मिळाला. काही ठिकाणी मात्र पावसाने जोरदार बॅटिंग केली तर काही ठिकाणी पावसाच्या अगदी तुरळक सरी बरसल्या. वारजे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर कात्रज, कोथरुड, स्वारगेट, नांदेड सिटी, सिंंहगड रोड परिसरात मात्र अगदी काहीच वेळ सरी बरसल्या. उद्या म्हणजेच 25 आणि 26 जून रोजी पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
हे ही वाचा :