Prajakta Mali 
Latest

Prajakta Mali : ही तुझी गोड स्माईल खूप गुलाबी आहे ?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने गुलाबी रंगाच्या साडीतील काही फोटो शेअर करताच कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळत आहे. प्राजक्ताचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक फोटोला लाईक्स आणि कमेंट्स नाहीत, असे होणारचं नाही. आतादेखील तिने नवे फोटो शेअर केल्याने प्राजक्ता चर्चेत आली आहे. अभिनयासोबतच ती दागिन्यांच्या व्यवसायातही उतरली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रामधून तिने सूत्रसंचालक म्हणून आपले कौशल्य सिद्ध केले आहे.

प्राजक्ताने आपले काही अप्रतिम फोटोज शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचे मनमोहक सौंदर्य खुललेले दिसतेय. ती नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. ती अनेकदा आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये जरी बॉर्डर असलेली वांगी कलरची साडी नेसलीय. त्यावर स्लिव्हलेस ब्लाऊज घातले आहे. साजेसे ईअरिंग्ज आणि हातात सिल्व्हर कडे घातले आहे. केसांचा सुंदर अंबाडा बांधत ओठांवरील गुलाबी लिपस्टिक सर्वांना मोहून टाकणारी आहे. तिचं हास्य मनावर रुंजी घालणारं आहे.

तिने काही फोटोंना तू जहाँ जहाँ चलेगा.. मेरा साया साथ होगा..।. तू कोई जनम भी लेगा.. मेरा साया साथ होगा…। #oldsong #love #melody #prajakttamali @? अशी कॅप्शन दिलीय.

सध्या तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती म्हणताना दिसतेय- नवीन वर्षात माझं अजून एक स्वप्न पूर्ण होतंय. प्राजक्ताने तिचं पिपंरी -चिंचवड येथे स्वत:चं घर घेतल्याची गुड न्यूज शेअर केली आहे. प्राजक्ताच्या या व्हिडिओवर नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडताहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT