Prajakta Mali  
Latest

Prajakta Mali : प्राजक्ताचं मराठी प्रेम; अस्सल मराठी सौंदर्याची खाणचं तू!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाीन डेस्क : आज मराठी गौरव भाषा दिनानिमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali ) मराठी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे, तिने मराठी लूक करून काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जांभळ्या रंगाच्या साडीवर लाल रंगाचे ब्लाऊज परिधान केले आहे. गळ्यामध्ये पारंपरिक दागिने, कपाळावर कुंकू, नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्या, बाजूबंद आणि केसांचा अंबाडा असा शृंगारमध्ये तिला पाहून अस्सल मराठी सौंदर्य काय असतं, हे दिसतं. (Prajakta Mali )

कवी कुसुमाग्रज यांच्या कवितेच्या ओळी लिहू तिने मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तिने फोटो शेअर करत म्हटलंय-

प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं..
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं…
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं..
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं…

कवीश्रेष्ठ कुसूमाग्रजांनी लिहीलेल्या ह्या ओळींसारखंच प्रेम आहे माझं, माझ्या "मराठीवर"…♥️♥️♥️
जे आहे आज, राहील उद्या , परवा..मरणोत्तरही….. ?

"मराठी भाषा गौरव दिनाच्या"; महाराष्ट्राला आभाळभर शुभेच्छा…♥️

प्राजक्ताच्या या फोटोंवर तर कमेंट्सची बरसात झालेली दिसतेय.

नेटकऱ्यांनी काय म्हटलंय पहा – Tumi kup chan dista ❤️❤️❤️, मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अभिमानाने सांगतो मराठी माणूस आणि मराठी पारंपरिक आणि सांस्कृतिक आणि ऐतिहासिक आणि वारसा याबद्दल अभिमान आहे आणि प्राजु तुमची मराठी पारंपरिक शैली आणि मराठी दिसायला तुझी राणी ? महाराष्ट्राची आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ❤️❤️ ❤️❤️❤️❤️❤️ आणि जय भवानी ? जय शिवाजी ? जय हिंद ?? जय महाराष्ट्र ?, छु जाते हो मुझे कितनी दफ़े तुम युँ ही ख़्वाब बन के, कौन कहता है कि दुर रहकर मुलाक़ात नहीं होती ?❤️, खरं माझं पण तेवढं च प्रेम आहे मराठी भाषेवर.. म्हणून तर तुम्ही जास्त आवडतात nttu darling ❤️?, वा वा प्राजू वा ?✌️, मराठी लय भारी.. ♥️???, मनमोहक ❤️, Pretty Looks Prajakta ❤️.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT