Salaar 
Latest

Salaar Box Office Collection : प्रभासच्या ‘सालार’ ची दुसऱ्या आठड्यातही धुमाकूळ

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता प्रभासचा 'सालार' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा धमाकेदार चित्रपट २२ डिसेंबर २०२४ रोजी सिनेमा गृहात येताच चाहत्यांनी एकच जल्ल्लोष केला. आता चित्रपटाला रिलीज होवून दुसरा आठवडा असून बॉक्स ऑफिसवर भरघोस अशी कमाईचे आकडे समोर येत आहेत. रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने ९० कोटींहून अधिक कमाई करून २०२३ मधील सर्वात मोठा ओपनर ठरला. पहिल्या दिवसांपासून हा चित्रपट दररोज दमदार कलेक्शन करत आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे, दुसऱ्या रविवारीही ( ३१ डिसेंबर ) 'सालार' ने बंपर कमाई केली. आता 'सालार'च्या ११व्या दिवसांचे कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. ( Salaar Box Office Collection )

संबंधित बातम्या 

'सालार' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असून अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. या क्राईम थ्रिलर चित्रपटाला चाहत्यांचा खूपच प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या कमाईबद्दल सांगायचे झाल्यास तर, 'सालार' ने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात ३०८ कोटी रुपयांची कमाई केली होती. आता दुसऱ्या आठवड्यातही तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या शुक्रवारी ९.६२ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या शनिवारी १२.५५ कोटी रुपयांची कमाई केली आणि दुसऱ्या रविवारी चित्रपटाच्या कमाईत २०.३२ टक्क्यांनी वाढ होवून १५.५० कोटी रुपयांची भरघोस अशी कमाई केली. आता चित्रपटाच्या रिलीजच्या ११ व्या दिवसाची म्हणजे, दुसऱ्या सोमवारच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

एका रिपोर्टच्या माहितीनुसार, 'सालार' ने रिलीजच्या ११ व्या दिवशी म्हणजे, दुसऱ्या सोमवारी १५.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर आतापर्यत 'सालार' ची एकूण कमाई ३६०.७७ कोटींवर पोहोचली आहे. केवळ देशातच नव्हे तर जगभरातही प्रभासचा 'सालार' तुफान बॅटिंग करत आहे. १० दिवसांत चित्रपटाने वर्ल्डवाईड ५२७.४० कोटींची कमाई केली आहे. तर ११ व्या दिवशी या चित्रपटाने वर्ल्डवाईड ६५० कोटींचा आकडा पार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ( Salaar Box Office Collection )

'सालार' चे दिग्दर्शन केजीएफ फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांनी केलं आहे. प्रभाससोबत चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, जगपती बाबू रेड्डी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट दोन मित्रांची कथा सांगणारा असून जे चांगले मित्र आहेत पण, परिस्थितीमुळे एकमेकांचे शत्रू बनतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT