Latest

Prabhas : बाहुबली स्टार प्रभासकडे आहेत ‘या’ महागड्या गाड्या

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट कलाकारांमध्ये अलिशान गाड्यांचं मोठं फॅड पहायला मिळतं. अनेक बॉलिवूड कलाकारांकडे कोट्यवधी रुपयांच्या देशी-विदेशी गाड्या पहायला मिळतात. बाहुबली स्टार प्रभास (Prabhas) या हिरोचेदेखील गाड्यांवर असणारे प्रेम त्याच्याकडे असणा़ऱ्या कारवरून पहायला मिळतो.

तेलुगू चित्रपट स्टार प्रभास हा सध्या त्याचा नवीन चित्रपट राधेश्याममुळे खूप चर्चेत आहे. राधे श्याम हा बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करत आहे. त्याचबरोबर त्याचा आगामी सिनेमा आदिपुरुष या सिनेमाबद्दल देखील चाहत्या वर्गांमध्ये चर्चा आहे.

चित्रपटांव्यतिरिक्त प्रभास त्याच्या लाइफस्टाइल आणि महागड्या कारसाठीही खूप चर्चेत आहे. तो कधी रोल्स रॉयस फँटममध्ये स्पीड आणि थ्रिलचा आनंद लुटताना दिसतो. तर कधी लॅम्बोर्गिनी एव्हेंटाडोर सारख्या आलिशान कार बाळगत त्याचं कारवरचं प्रेम दाखवतो.
आज आम्ही तुम्हाला प्रभासचे कार कलेक्शन, त्याच्या गॅरेजमध्ये असलेल्या लक्झरी कार आणि त्यांच्या किंमतीबद्दल सांगणार आहोत.

प्रभासकडील अलिशान कार

  • प्रभासची सर्वात महागडी कार रोल्स रॉयस फॅंटम ही आहे (Rols Royce Phantom). तिची किंमत 8 कोटी रुपये आहे.
  • त्याच्या गॅरेजमध्ये सुपरकार लॅम्बोर्गिनी एव्हेंटाडोर एस रोडस्टर आहे, जिची किंमत 6 कोटी रुपये आहे.
  • बीएमडब्ल्यू 7 सीरिजची कार देखील आहे, जिची किंमत 2 कोटी रुपये आहे.
  • मर्सिडीज-बेंझ एस क्लास कार देखील आहे, जिची किंमत 2 कोटी रुपये आहे.

साऊथ तसेच हिंदी चित्रपटांमध्ये आपली चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रभासचे गाड्यांवरचं प्रेम हे त्याच्याकडे असणाऱ्या या महागड्या कारवरून दिसून येते.

तसेच प्रभासच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या आदिपुरुष या सिनेमासाठी व्यस्त आहे. 'आदिपुरुष' हा ओम राऊत दिग्दर्शित 'रामायण' या हिंदू पौराणिक कथेवर आधारित आहे. हा सिनेमा टी-सीरीज आणि रेट्रोफिल्स द्वारा निर्मित होणार आहे. या चित्रपटात प्रभास या सिनेमात मुख्य भूमिकेत असेल, सीताच्या भूमिकेत क्रिती सेनॉन आणि लंकेशच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT