पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज ( दि. २२) उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे.
आज देशभरात ११३४ नवे कोरोना रुग्ण आढळले. सध्या देशात ७ हजार ०२६ कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. मागील २४ तासांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. छत्तीसगड, दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय केरळमध्ये एका कोरोनाबाधित व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.
केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. राज्य सरकारने आज ( दि. २२) सर्व जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, मंगळवारी राज्यात कोरोनाचे १७२ नवे रुग्ण आढळले. तिरुवनंतपुरम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या अधिक आहे. राज्यात सध्या १,०२६ सक्रिय रुग्ण आहेत, त्यापैकी १११ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा :