पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलने 20 दशलक्ष सबस्क्राइबर्स म्हणजेच 2 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 
Latest

PM मोदींचा ‘YouTube’ वरही बोलबाला, अशी कामगिरी करणारी ठरले जगातील पहिले राजकीय नेते

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या लोकप्रियतेची ख्‍याती संपूर्ण जगभरात आहे. सोशल मीडियावरही त्‍यांच्‍या लोकप्रियतेची चर्चा होते. नुकताच त्‍यांनी यूट्यूबवर एक नवा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारे ते जगातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. ( PM Modi's YouTube channel )  जाणून घेवूया त्‍यांच्‍या नव्‍या विक्रमा विषयी…

सर्वाधिक सबस्क्राइबर्स असलेले जगातील पहिले राजकीय नेते

पंतप्रधान नरेंद्र माेदी. ( संग्रहित छायाचित्र )

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलने 20 दशलक्ष सबस्क्राइबर्स म्हणजेच 2 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारे ते जगातील पहिले राजकीय नेते बनले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या यूट्यूब चॅनलवर 23 हजार व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.  ( PM Modi's YouTube channel )

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले नेते ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सनोरा आहेत, ज्यांच्या यूट्यूब चॅनेलच्‍या सबस्क्राइबर्स संख्या ६.४ दशलक्ष इतकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना करता ती खूपच कमी आहे. जागतिक नेत्यांमध्ये तिसर्‍या स्‍थानावर सर्वाधिक सबस्क्राइब केलेले चॅनल युक्रेनचे राष्ट्राध्यक्षांचे आहे. त्‍यांच्‍या चॅनलचे सबस्क्राइबर्स 1.1 दशलक्ष इतके आहेत. या यादीत चौथ्या स्थानावर अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन आहेत. त्‍याच्‍या यूट्यूब चॅनेलच्‍या सबस्क्राइबर्स संख्या केवळ 794,000 इतकी आहे.

 PM Modi's YouTube channel : डिसेंबर 2023 मध्ये 2.24 अब्ज व्ह्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या यूट्यूब चॅनेलने डिसेंबर 2023 मध्ये प्रभावी 2.24 अब्ज व्ह्यूज नोंदवले गेले. हा आकडा जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावरील व्ह्यूज असलेल्या युक्रेनचे अध्‍यक्षांच्‍य चॅनेलपेक्षा 43 पट अधिक आहे. ही आकडेवारी नरेंद्र माेदी यांचे डिजिटल व्‍यासपीठावरील लोकप्रियता दर्शवते.

यूट्यूब चॅनेल सबस्क्राइबर्स असलेले काही इतर जागतिक नेते आहेत. त्‍यामध्‍ये तुर्कीचे रेसेप तायिप एर्दोगान 419,000 , फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन 316,000, अर्जेंटिनाचे अल्बर्टो फर्नांडेझ 81,200 आणि कॅनडाचे जस्टिन ट्रूडो  यांच्‍या यूट्यूब चॅनेल सबस्क्राइबर्स  69,060 इतके आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या यूट्यूब चॅनेलने फेब्रुवारी 2022 मध्ये एक कोटी सदस्यांचा आकडा पार केला होता.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT