Pune Women Bike Rally Pudhari
पिंपरी चिंचवड

Women Bike Rally PCMC: पिंपरी- चिंचवडमध्ये महिला बाईक रॅलीतून होणार स्त्रीशक्तीचा जागर; सहभागी कसे व्हाल?

Pudhari Kasturi Club: रामनवमीनिमित्त ‌‘पुढारी कस्तुरी क्लब‌’चा उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

Pudhari Kasturi Club Pimpri Chinchwad Women Bike Rally

पुणे : रॅली महिला सक्षमीकरणाची, आत्मविश्वासाची, सन्मानाची अन्‌‍ आत्मनिर्भरतेची... असा महिला सक्षमीकरणाचा नारा बुलंद करणाऱ्या आणि महिला शक्तीला सलाम करणाऱ्या कृष्णा डायग्नोस्टिक प्रायोजित दै. ‌‘पुढारी‌’ आणि ‌‘पुढारी कस्तुरी क्लब‌’च्या वतीने महिला भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. खास रावनवमीनिमित्त ही बाईक रॅली गुरुवार (दि. 26 मार्च) आयोजित करण्यात आली आहे आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. गुरुवारी सकाळी सात वाजता चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिरपासून रॅली निघणार आहे.

‌‘दै. पुढारी कस्तुरी क्लब‌’च्या वतीने नेहमीच महिलांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित केले जातात. महिलांना एक व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठीही कस्तुरी क्लब कार्यरत आहे. त्यापैकीच एक उपक्रम म्हणून दरवर्षी रामनवमीच्या पार्श्वभूमीवर महिला भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले जाते. या रॅलीत दरवर्षी मोठ्या संख्येने महिला सहभागी होतात आणि बाईक चालवून महिला सक्षमीकरणाचा संदेश देतात. यंदाही मोठ्या उत्साहात रॅलीचे आयोजन केले असून, गुरुवारी (दि. 26) होणाऱ्या या रॅलीत शेकडो महिला सहभागी होणार आहेत.

‌‘रॅली महिलांच्या आत्मविश्वासाची, आत्मनिर्भरतेची आणि आत्मसन्मानाची‌’ अशी रॅलीची संकल्पना आहे. ढोल-ताशा, लेझीम आणि दांडपट्टा पथकांचे सादरीकरण हे प्रमुख आकर्षण असणार आहे. कृष्णा डायग्नोस्टिक हे रॅलीचे मुख्य प्रायोजित आहेत. तर, सुवर्णकला जेम्स ॲण्ड ज्वेलरी, टायगर ब्रॅण्ड मसाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या रॅलीत कस्तुरी सदस्यांसह इतर महिलांनाही सहभागी होता येणार आहे. महिलांचे ग्रुप घेऊन येणाऱ्या ग्रुप लीडरना ट्रॉफी देऊन रंगमंचावर सन्मानित करण्यात येईल. या बाईक रॅलीसाठी ड्रेस कोड असून, कोणत्याही रंगाची नऊवारी किंवा पांढरा कुर्ता आणि निळ्या रंगाची जीन्स किंवा लेगिन्स घालावी. या रॅलीसाठी महिलांना प्रवेश विनामूल्य आहे. बाईक रॅलीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकीला प्रशस्तिपत्र आणि येणाऱ्या प्रत्येकीला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

अशी करा नावनोंदणी

दै. ‌‘पुढारी‌’च्या वतीने आयोजित केलेल्या महिला भव्य बाईक रॅलीत कस्तुरी क्लब सदस्यांसह इतर महिलांनाही सहभागी होता येणार आहे. त्यासाठी पूर्वनावनोंदणी करणे आवश्यक आहे. बाईक रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नावनोंदणीसाठी लिंक

इथे करा संपर्क :

महिला भव्य बाईक रॅलीत सहभागी होण्यासाठी

नावनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी

8888808027/7040848572 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

महिलांना मिळणार आकर्षक भेटवस्तू

रॅलीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत. रॅलीचे गीफ्ट पार्टनर असलेल्या सुवर्णकला जेम्स ॲण्ड ज्वेलरी, टायगर ब्रॅण्ड मसाले यांच्या वतीने महिलांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिरापासून गुरुवारी सकाळी सात वाजता होणार प्रारंभ

रॅली कधी : गुरुवार, दि. 26 मार्च 2026

वेळ : सकाळी सात वाजता

स्थळ : मोरया गोसावी मंदिर,

चिंचवडगाव

...मग रॅलीत सहभागी व्हाच!

महिलांचा ग्रुप घेऊन येणाऱ्या ग्रुप लीडरना ट्रॉफी देऊन रंगमंचावर सन्मानित केले जाईल.

ड्रेस कोड : कोणत्याही रंगाची नऊवारी किंवा पांढरा कुर्ता आणि निळी जीन्स किंवा लेगिन्स.

प्रत्येकीला चहा-नाष्टा; नावनोंदणी आवश्यक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT