वडगाव मावळ: वडगाव नगरपंचायतच्या आज झालेल्या विषय समित्यांच्या निवडणुकीत स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्षा अबोली ढोरे, पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, बांधकाम समितीच्या सभापतीपदी गणेश म्हाळसकर, आरोग्य समितीच्या सभापतीपदी माया चव्हाण व महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सुनीता ढोरे, उपसभाप तीपदी पूनम भोसले यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान, भाजपच्या वतीने एकही सदस्य नामनिर्देशित न केल्याने समित्यांमध्ये भाजप नगरसेवकांचा समावेश होऊ शकला नाही.
पीठासन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात झालेल्या विशेष सभेत स्थायी समिती व विषय समिती निवडणूक प्रक्रिया पार पडली. या वेळी नगराध्यक्षा अबोली ढोरे, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, राष्ट्रवादीचे गटनेते अजय म्हाळसकर, पक्षप्रतोद माया चव्हाण, भाजपचे गटनेते दिनेश ढोरे, पक्षप्रतोद अनंता कुडे, नगरसेवक पूनम भोसले, रोहित धडवले, सुनीता ढोरे, रूपाली ढोरे, विशाल वहिले, अजय भवार, सारिका चव्हाण, आकांक्षा वाघवले, गणेश म्हाळसकर, वैशाली सोनवणे, राणी म्हाळसकर, स्वीकृत नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, संदीप म्हाळसकर उपस्थित होते.
या वेळी तौलानिक संख्याबळानुसार एक स्थायी समिती व पाच विषय समित्या तसेच प्रत्येक समितीमध्ये पाच सदस्य अशी संख्या निश्चित करण्यात आली. त्यानुसार, राष्ट्रवादीला प्रत्येकी 3 तर भाजपला प्रत्येकी 2 सदस्य एका समितीमध्ये नियुक्त करण्याची संधी होती. त्यानुसार, राष्ट्रवादीच्या वतीने सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले, परंतु भाजपच्या वतीने एकही सदस्य नामनिर्देशित करण्यात आला नाही. तसेच, राष्ट्रवादीकडे सूचक, अनुमोदक उरले नाही, त्यामुळे नियोजन व विकास समिती रिक्त राहिली. याशिवाय प्रत्येक समितीमध्ये सदस्यपदाच्या दोन जागा रिक्त राहिल्या. पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष सुनील ढोरे यांचे नाव गटनेते अजय म्हाळसकर यांनी नामनिर्देशित केले. त्यामुळे सभापतीपदी सुनील ढोरे यांची निवड झाली. तसेच, स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष हे पदसिद्ध सभापती असल्याने प्रत्येक समितीचे सभापती हे या समितीचे सदस्य असल्याने त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
विरोधी पक्षनेत्यांची अनुपस्थिती
नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर स्थायी समिती व विषय समित्या गठीत करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या विशेष सभेस विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर या गैरहजर होत्या. तसेच, गटनेते व इतर नगरसेवक उपस्थित राहिले, परंतु त्यांनी निवड प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.
समितीनिहाय सभापती व सदस्य:
स्थायी समिती : सभापती अबोली ढोरे.
सदस्य : सुनील ढोरे, गणेश म्हाळसकर, माया चव्हाण, सुनीता ढोरे
पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती : सभापती : सुनील ढोरे. सदस्य : वैशाली सोनवणे, आकांक्षा वाघवले
सार्वजनिक बांधकाम समिती : सभापती : गणेश म्हाळसकर. सदस्य : अजय भवार, आकांक्षा वाघवले
स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती : सभापती : माया चव्हाण. सदस्य : रूपाली ढोरे, अजय म्हाळसकर
महिला व बालकल्याण समिती : सभापती : सुनीता ढोरे, उपसभापती : पूनम भोसले, सदस्य : वैशाली सोनवणे
म्हणून नियोजन समिती राहील रिक्त !
तौलानिक संख्याबळानुसार एक स्थायी समिती व पाच विषय समित्या तसेच प्रत्येक समितीमध्ये पाच सदस्य अशी संख्या निश्चित करण्यात आली. त्यानुसार, राष्ट्रवादीला प्रत्येकी 3 तर भाजपला प्रत्येकी 2 सदस्य एका समितीमध्ये नियुक्त करण्याची संधी होती. त्यानुसार राष्ट्रवादीच्या वतीने सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले; परंतु भाजपच्या वतीने एकही सदस्य नामनिर्देशित करण्यात आला नाही. तसेच राष्ट्रवादीकडे सूचक, अनुमोदक उरले नाही, त्यामुळे नियोजन व विकास समिती रिक्त राहिली. याशिवाय प्रत्येक समितीमध्ये सदस्यपदाच्या दोन जागा रिक्त राहिल्या.
त्यामुळे भाजपने बहिष्कार घातला : दिनेश ढोरे
उपनगराध्यक्ष निवडणूकप्रसंगी सर्वांनी गावच्या विकासासाठी एकोप्याने काम करावे या राष्ट्रवादीच्या आवाहनानुसार आम्ही माघार घेतली होती. त्यानुसार, विषय समित्यांमध्ये दोन विषय समित्या भाजपला द्याव्यात, अशी मागणी केली होती. परंतु, राष्ट्रवादीने नकार दिल्याने आम्ही एकही सदस्य नामनिर्देशित न करण्याचा व विषय समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे भाजप गटनेते दिनेश ढोरे यांनी सांगितले.
लोणावळा नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवडणूक आज बिनविरोध पार पडली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या पीठासनाखाली नगर परिषदेच्या सभागृहामध्ये ही निवड प्रक्रिया झाली. नऊ सदस्य संख्या असलेल्या समितीमध्ये तौलानिक संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग््रेासचे सहा सदस्य, काँग््रेास अपक्ष गट, भाजप व सत्य विकास गट यांच्या एका सदस्याची निवड झाली.
प्रत्येक समितीसाठी राष्ट्रवादी काँग््रेास गटाकडून एक नाव देण्यात आल्याने त्या सर्वांचे सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असल्याने राजेंद्र सोनवणे यांचे नाव सभापती म्हणून घोषित करण्यात आले. स्थायी समितीमध्ये सर्व विषय समित्यांचे सभापती पदसिद्ध सदस्य असतात, याव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग््रेासकडून सनी घोणे, भाजपकडून दत्तात्रय येवले व काँग््रेासकडून मुकेश परमार यांना संधी देण्यात आली आहे.
उपनगराध्यक्ष हे नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध सभापती असल्याने भाजपचे देविदास कडू यांच्या नावाची सभापती म्हणून घोषणा करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी सनी दळवी, पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापतीपदी जीवन गायकवाड, स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी धनंजय काळोखे, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी दीपा मंगेश अगरवाल, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी स्वप्ना कदम यांची, तर उपसभापतीपदी भाग्यश्री जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व पीठासीन अधिकारी अशोक साबळे यांनी सर्व नवनिर्वाचित विषय समित्यांचे सभापती व सदस्य यांचे अभिनंदन केले.