पिंपरी: दरवर्षी पितृ पंधरवड्यामध्ये भाज्यांचे दर वाढलेले असतात. कारण विविध प्रकारांच्या भाज्यांना या दिवसात मोठी मागणी असते. मात्र, ग्रामीण भागात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत भाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्याने कमी झाले आहेत. (Latest Pimpri News)
गेल्या आठवड्यात भाज्यांचे दर शंभरी पार होते. मात्र, या आठवड्यात भाज्यांचे दर निम्म्याने कमी झाले आहेत. कांदे 20 रुपये किलो, लसूण 100-120, टोमॅटो 30, गवार 160-200, शेवगा 100, वाटाणा 100-120, भेंडी 50-60, फ्लॉवर 60, कोबी 30, मिरची 50, गाजर 50, शिमला 70-80, वांगी 40 - 50, आले 80, काकडी 30, कारली 60-70, लाल भोपळा 50-60, पावटा 60, घोसाळी 70-80, दोडका 70-80, दुधी 60, घेवडा 100-120, बिन्स 60 रुपये किलो होते.
पाले भाज्यांचे दर (रुपयांत) प्रतिजुडी
कोथिंबीर 20, मेथी 25-30, पालक 15, शेपू 15, पुदिना 10, मुळा 25, चवळई 20, लाल माठ 30 ते 40, कांदापात 20, करडई 15, आळू पाने 15 जुडी, आंबट चुका 20.