जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा  pudhari
पिंपरी चिंचवड

Ashadhi Wari 2025: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त असे आहेत वाहतुकीतील बदल

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात 16 ते 20 जून या कालावधीत वाहतुकीत बदल करण्यात आले

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात 16 ते 20 जून या कालावधीत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. देहूगाव येथून 18 जून रोजी पालखी सोहळा प्रस्थान करणार असून, 19 जूनला आकुर्डीतील विठ्ठल मंदिराजवळ मुक्काम आणि 20 जूनला पुण्याकडे प्रस्थान होणार आहे. त्यामुळे पालखी मार्गांवर अनेक मार्ग बंद असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक उपायुक्त बापू बांगर यांनी केले आहे.

पालखी मार्ग

देहूगाव - अनगडशहा बाबा दर्गा - चिंचोली - भक्ती-शक्ती चौक -निगडी - आकुर्डी विठ्ठल मंदिर - खंडोबा माळ चौक - महावीर चौक - मोरवाडी - पिंपरी - वल्लभनगर -नाशिक फाटा - फुगेवाडी - दापोडी - हॅरिस बि—जमार्गे पुणे.

देहूगावात प्रवेश बंद (16 ते 19 जून) :

काळोखे चौक, कंदपाटील चौक, भैरवनाथ चौक, गायरान क्रीडा संकुल, मुख्य कमानसह सर्व प्रमुख रस्ते बंद

देहूरोड विभाग (19-20 जून)

सेंट्रल चौक देहूरोड ते भक्ती-शक्ती चौक बंद

निगडी विभाग (19-20 जून)

भक्ती-शक्ती चौक ते पुणे, खंडोबा माळ ते टिळक चौक, त्रिवेणीनगर, थरमॅक्स चौक, म्हाळसाकांत चौक, दीपज्योती अपार्टमेंट परिसरातील अनेक रस्ते बंद

चिंचवड विभाग (19-20 जून)

दळवीनगर, महावीर चौक, चापेकर चौक, लोकमान्य हॉस्पिटल, एसकेएफ चौक, सांगवी ते रांका ज्वेलर्स, शिवाजी महाराज चौक बंद

पिंपरी विभाग (20 जून)

ऑटो क्लस्टर, मोरवाडी चौक, पिंपरी पूल, एचए चौक, जीआय कंपनी, साई चौक, बसवेश्वर चौक, संत तुकाराम पुतळा चौक, वल्लभनगर बसस्थानक बंद

भोसरी विभाग (20 जून)

नाशिक महामार्ग - नाशिक फाटा मार्गे पुण्याकडे जाणार्‍या वाहनांना बंदी

पर्यायी मार्ग

वाहतूक शाखेने तळवडे गावठाण, कॅनबे चौक, एचपी चौक, त्रिवेणीनगर, डांगे चौक, रावेत, वल्लभनगर, मरीआई मंदिर, भाटनगर, कोकणे चौक, वाल्हेकरवाडी, परशुराम चौक आदी मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांकडून आवाहन

पालखी मार्गांवर व आसपासच्या परिसरात वाहनांची व नागरिकांची गर्दी टाळावी, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

देहूगाव पार्किंग ठिकाणे

  • गायरान मैदान

  • सीओडी मैदान (राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ)

  • खंडेलवाल चौकजवळ मोकळे मैदान

  • सप्तपदी मंगल कार्यालय

  • भगीरथी लॉन्स

वाहतूक बंदी

  • जड वाहने बंदी (16 ते 19 जून) :

  • जुना मुंबई-पुणे मार्ग : देहू कमान ते देहूगाव बंद

  • तळेगाव-चाकणरोड : देहूफाटा ते देहूगाव बंद

  • आयटी पार्क ते काळोखे पाटील चौक बंद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT