तळेगावकर सापडले समस्यांच्या विळख्यात Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri News: तळेगावकर सापडले समस्यांच्या विळख्यात

तळेगाव दाभाडे येथील रहीवाशी सध्या समस्यांच्या विळख्यात सापडले असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: तळेगाव दाभाडे येथील रहीवाशी सध्या समस्यांच्या विळख्यात सापडले असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांना वाली कोण नाही असे चित्र निर्माण झाले आहे. सोमाटणे येथील पाणीपुरवठा करणारी मुख्यदाब नलीका सतत लिकेज होत असते यामुळे पाणीपुरवठा सतत खंडीत होत असतो.

तळेगाव चाकण महामार्गावर सतत वाहतूक कोंडी असते वाहतूक कोंडी झाली की काही वाहने तळेगाव स्टेशन-जिजामाता चौक या रोडकडे वळतात यामुळे तेथेही वाहतूक कोंडी होते. यामुळे नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होवून नियोजित ठिकाणी वेळेवर पोहोचता येत नाही.  (Latest Pimpri News)

वाहतूक कोंडीच्या ग्रहणातून वाहन चालकांची,नागरिकांची कधी सुटका होईल ते ठामपणे कोणालाही सांगता येत नाही.पाईप लाईनसाठी अनेक ठिकाणी चारी खोदल्या आहेत. ही कामे आणि डांबरीकरणाची कामे मार्च एप्रीलच्या सुमारास होणे आवश्यक होती, ती आता पावसाळ्याच्या तोंडावर करण्यास आरंभ झाला आहे.

यामुळे रोडराडा झालेला आहे चारीत पाणी साचत आहे यामुळे वाहन चालकांना आणि पायी चालणा-यांना त्रासदायक होत आहे.तळेगाव स्टेशन,एसटीस्टँड रोड,आदी ठिकाणचा रस्ता खराब झालेला असून त्या ठिकाणी धोकादायक खड्डे आहेत. पावसाचे पाणी साचलेकी ते आणखी धोकादायक होतात याबाबत प्रशासना कडून कायम स्वरुपी कार्यवाही केली जात नाही.

तळेगाव-चाकण मार्गावरील मच्छी मार्केट,इंद्रायणी कॉलेज गेट,मशिद जवळ दरवर्षी थोडा जरी पाऊस पडला तरी पाणी साचत आहे यामुळे विद्यार्थ्यांना आणि दुचाकी चालकांना फारच त्रास होत आहे याबाबत प्रशासन गंभीर नाही.डीपी रोड,कातवी रोड एसटीस्टँड परिसर येथे कच-यांचे साम्राज्य आहे कचरा पावसाने भिजत असतो तेथे भटक्या प्राण्यांचा वावर असतो हे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक आहे.

नगरपरिषदे कडून कचरा उचलला जातो परंतु बेजबाबदार नागरिक कचरा गाडीचा उपयोग न करता परत कचरा टाकतात त्यांना जरब बसवून आळा घालणे आवश्यक आहे.तसेच तळेगाव स्टेशन आणि गावभागाला आणि जोडणारा भुयारी मार्ग कधी पाण्याने भरेल आणि नागरिकांच्या समस्येत आणखी भर पडेल हे सांगता येत नाही.

अशा प्रकारे तळेगावकर नागरिक सतत खंडीत पाणीपुरवठा,वाहतूक कोंडी,चा-यांमुळे रोडराडा,कचरासमस्या धोकादायक खड्डे या समस्यांच्या विळख्यात तळेगावकर सापडले आहेत त्यात अवेळी पाऊस यासमस्यांमुळे तोंड दाबून बुक्कयांचा मार अशी अवस्था परिसरातील नागरिकांची झालेली आहे.

चौकट-स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लांबणीवर पडल्यामुळे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नागरीसमस्या सोडविणेस अडचणी येत आहेत.तळेगाव दाभाडे शिवसेना शहर प्रमुख महादेव खरटमल. चौकट-तळेगाव दाभाडे येथील समस्या निवारण करणेबाबत वारंवार लेखी,तोंडी निदर्शनास आणले आहे. ठोस कार्यवाही झाली नाहीतर जनआंदोलन उभारले जाईल अरुण माने माजी नगरसेवक तळेगाव.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT