नवलाख उंबरे: सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा प्रभाव झपाट्याने वाढत असताना त्याचे दुष्परिणामही स्पष्टपणे दिसू लागले आहेत. विशेषतः तरुण कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांच्या नावाने ‘भाईगिरी’ आणि ‘दादागिरी’ दाखवणारी स्टेटस, व्हिडिओ आणि रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. ही प्रवृत्ती केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष वर्तनातही उतरू लागल्याने समाजात एक प्रकारची गुंडगिरीची मानसिकता निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
पूर्वी नेत्यांच्या नावाने समाजसेवा, विकासकामे किंवा प्रेरणादायी संदेश देणारे स्टेटस पाहायला मिळायचे. मात्र, आता त्याची जागा धमकीवजा संवाद, आक्रमक बॉडी लँग्वेज आणि पार्श्वभूमीला गुंडशाहीची गाणी यांनी घेतली आहे.
अनेक कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या फोटो किंवा व्हिडिओसोबत अशा प्रकारचे कंटेंट तयार करून स्वतःची मदहशतफ निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे.
ही प्रवृत्ती मइम्प्रेशन मॅनेजमेंटफ आणि मव्हर्च्युअल ओळखफ निर्माण करण्याच्या अतिरेकातून उद्भवत आहे. सोशल मीडियावर अधिक लाईक्स, शेअर्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी तरुणांमध्ये आक्रमक आणि वादग््रास्त कंटेंट तयार करण्याची स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेत समाजहित, नैतिकता आणि जबाबदारी यांचा विचार मागे पडत चालला आहे.
एकंदरीत, रिल्स आणि सोशल मीडियाच्या आहारी जात असलेली ही मगुंडशाहीची संस्कृतीफ वेळीच रोखली नाही, तर भविष्यात समाजासाठी ती मोठा धोका ठरू शकते. त्यामुळे नेते, पोलिस, पालक आणि समाजाने एकत्र येऊन यावर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
आजकाल काही तरुण सोशल मीडियावर जास्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतात. पण त्याचा परिणाम सामान्य लोकांवर होतो. रस्त्यावरही तेच आक्रमक वर्तन दिसायला लागते, जे धोकादायक आहे.- एकनाथ शेटे, ज्येष्ठ नागरिक.
रिल्स बनवणे हा एक ट्रेंड झाला आहे. लोकांना अटेंशन मिळविण्यासाठी थोडे वेगळे आणि आक्रमक दाखवावे लागते. पण याचा अर्थ आम्ही प्रत्यक्षात तसेच वागतो असे नाही.- गणेश भोसले, स्थानिक तरुण.
सोशल मीडियावर गुंडशाहीचे प्रदर्शन करणे आणि त्याद्वारे भीती निर्माण करणे हा कायद्याच्या चौकटीत गुन्हा ठरू शकतो. अशा प्रकरणांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि आवश्यक तेथे कारवाई केली जाते.- संतोष पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तळेगाव