Kusti Pudhari
पिंपरी चिंचवड

Maharashtra Kesari Saswad: सासवडमध्ये प्रथमच ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा; मार्चमध्ये रंगणार लालमातीतील थरार

पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक शहरात प्रतिष्ठेच्या मातीतील कुस्तीचे आयोजन; ग्रामीण क्रीडा परंपरेला नवी उभारी

पुढारी वृत्तसेवा

सासवड: पुरंदर तालुक्यातील सासवड येथे प्रथमच ‌‘महाराष्ट्र केसरी‌’ या प्रतिष्ठेच्या मातीतील कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस गौरव रोशनलाल (दिल्ली) यांनी बुधवारी (दि. 18) पत्रकार परिषदेत केली. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ही स्पर्धा होणार असून, त्यामुळे सासवडच्या लाल मातीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होणार आहे.

या वेळी राज्य सचिव मोहन खोपडे, राज्याध्यक्ष नितीन बारणे, ऑलिम्पिक पहिलवान व तांत्रिक अध्यक्ष ज्ञानसिंग तसेच आयोजक प्रकाश जगताप उपस्थित होते. महाराष्ट्र शैली कुस्ती संघटनेच्या वतीने गेली 60 वर्षे सातत्याने ‌‘हिंद केसरी‌’, ‌‘रुस्तुम-ए-हिंद‌’ आणि ‌‘भारत केसरी‌’ यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती रोशनलाल यांनी दिली. सासवड येथील स्पर्धा पै. प्रकाशबापू जगताप प्रतिष्ठानच्या माध्यमातून, सचिव पै. मोहन खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

सासवडसारख्या ऐतिहासिक शहरात ‌‘महाराष्ट्र केसरी‌’चे आयोजन होणे ही केवळ क्रीडा घटना नसून ग््राामीण क्रीडा परंपरेला चालना देणारी सामाजिक चळवळ ठरणार आहे. लालमातीतील कुस्तीची परंपरा जपत नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा सोहळा ठरेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT