Pending Works Pudhari
पिंपरी चिंचवड

Pending Works: संत तुकारामनगरमधील प्रलंबित विकासकामांची गती मंद; नागरिक त्रस्त

पदपथांवर व्यावसायिकांचे अतिक्रमण, अपूर्ण कामांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत; महापालिकेने त्वरित काम पूर्ण करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

खराळवाडी: संत तुकारामनगर व महेशनगर परिसरातील अनेक ठिकाणी विकासकामे हे प्रलंबित राहिली आहेत. सुखवाणी गृहनिर्माण सोसायटीसमोर खड्डे खोदून ठेवल्याने वल्लभनगर बसस्थानक ते संत तुकारामनगर उपनगर रस्त्यावर अक्षरक्ष: राडारोडा पसरला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर चालण्यासाठी स्वातंत्र्य पदपथ नाहीत. तसेच काही पदपथावर टपरीधारकांचे व्यवसाय असल्यामुळे पूर्ण पदपथ व्यावसायिकांनी गिळंकृत केला आहे. यामुळे पादचार्ऱ्यांची गैरसोय होत आहे. (Latest Pimpri chinchwad News)

संत तुकारामनगर व महेशनगर परिसरात कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट झालेला आहे. या बाबतीत जनसंवाद सभांमधून वारंवार निदर्शनास आणून दिले असून, महापालिका प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. संत तुकारामनगर, महेशनगर भागातील पदपथावर टपरीधारकांनी दुकाने थाटल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ राहिला नाही. यामुळे संत तुकारामनगर, महेशनगर, वल्लभनगर भागातील रस्त्यांवर पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथच शिल्लक न राहिल्याने मुख्य रस्त्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे; परंतु महापालिकेचा संबंधित विभाग याकडे डोळेझाक करत असल्याने सर्वसामान्य नागरिक प्रशासनाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त करत आहे.

वल्लभनगर एसटी बसस्थानकासमोर विकासकामांसाठी रस्ते खोदलेले असून त्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा येत असून, नागरिकांसह वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच बीआरटी मार्गावरील राहिलेले अपूर्ण कामे पूर्ण करावे. कासारवाडीकडून वल्लभनगरकडे येताना भुयारी मार्गाजवळील राडारोडा व कचरा तातडीने उचलावा.

पादचाऱ्य़ाप्रवास खडतर

महापालिका प्रशासनाच्या वतीने संत तुकाराम नगर व महेशनगर भागात संथ गतीने विकासकामे सुरू आहेत. रस्ते खोदाईमुळे वाहनचालकांसह पादचारी त्रस्त आहेत. त्यात पदपथांवरदेखील व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने पादचार्यांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने येथील प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

नागरिकांच्या मागण्या

  • परिसरातील झाडांची छाटणी नियमित करावी.

  • स्मार्ट सिटीअंतर्गत बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत.

  • निकृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करावी.

  • पथदिवे रात्री बंद असतात. त्यांची दुरुस्ती करून सुरू ठेवावेत.

  • बॅडमिंटन हॉलच्या भिंतीची नव्याने रंगरंगोटी करावी.

  • संत तुकारामनगर, महेशनगर आदी भागातील चेंबरचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. ते चांगले करावेत.

  • काम झालेल्या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवून पदपथ सुरळीत करावा.

  • वायसीएम हॉस्पिटल परिसरातील अनधिकृत बॅनरवर कारवाई करावी.

  • महापालिकाच्या अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई पक्षपाती नसावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT