पिंपळे निलख: क्षेत्रीय ड कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच रस्त्याला भलेमोठे भगदाड पडले होते, परंतु क्षेत्रीय अधिकारी, स्थापत्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना हे भगदाड दररोज दिसत असून याकडे डोळेझाक केली जात आहे. यामुळे येथून प्रवास करणार्या वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भातील वृत्त दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाच्यावतीने याची दुरुस्ती करण्यात आली आहे. (Latest Pimpri chinchwad News)
या रस्त्यालगतच महादेव मंदिर असल्यामुळे महिला व लहान मुलांची सतत वर्दळ असते. तसेच, सायकल मार्गावरुन प्रवास करणारे सायकलस्वार यांनीदेखील वारंवार क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार करूनदेखील अधिकारी व संबंधित विभाग दखल घेत नसल्याने सणासुदीत नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
मंदिरासमोर हे भगदाड फक्त अपघाताचा धोका निर्माण करत नाही, तर ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीमुळे त्रास होत होता. विशेषतः लहान मुलं, महिला आणि वृद्ध मंडळींना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. दररोज अधिकारी व कर्मचारी या मार्गावरुन कार्यालयात ये-जा करतात. तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत होते.
तसेच, यामुळे अपघाताचा धोका, दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्या वाढत होत्या. या संदर्भातील वृत्त दैनिक पुढारीमध्ये प्रशासनाच्यावतीने याची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची समाधान व्यक्त केले आहे. प्रसिद्ध होताच प्रशासनाच्यावतीने याची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची समाधान व्यक्त केले आहे.