पिंपरी: रमजान म्हणजे मुस्लिमांचा पवित्र महिना. रमजान महिन्यात रोजे असतात. याच रोज्याच्या दरम्यान उपवासासाठी हमखास खजूर खरेदी केले जातात. हे उपवास सुरु झाले असल्याने विविध प्रकारचे खजूर पिंपरी- चिंचवडच्या बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध झाले आहेत.
बाजारपेठेत अजवा, सुलतान, केरमन, फरद, अजवा, साद, रुक्साना, मदजूल, रॉयल, किंग, पेंड खजूर, मगजोल , किमया, यास्मिन , फरद , कलमी, इराणी, सुशीला, गुलाबी , ग्रीन फरद आदी खजूर बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. त्यामध्ये इराणचे खजूर स्वस्त आहेत तर ओमनचे खजूर महाग आहेत. खजूर खरेदी करण्यासाठी पिंपरी मार्केटमध्ये ग्राहकांनी गर्दी केली आहेत .
हे सर्व खजूर इराण, अफगाण या पर देशामधून आपल्या भारतीय बाजारपेठेत विक्रीस येतात. यंदाच्या वर्षी खजुराची आवक कमी झाल्यामुळे भावात काहीशी वाढ झाली आहे. बाजारात 300 रूपयांपासून ते 1200 रूपयांपर्यंत खजूर विक्रीस उपलब्ध आहेत.
खजूर दर पुढीलप्रमाणे:
कलमी 400 रुपये, मगजोल 1200, फरद 700 रुपये, अजवा 550 रुपये, साद 480, रुक्साना 600 -700, किमया 360, जास्मिन 900 रूपये.
इराण आणि अफगाण देशातून खजूर विक्रीस येतात. मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू असताना खजुराची मागणी वाढते.मनोहर जेठवानी (विक्रेते)