'पिंपरी चिंचवडला दिलासा, पावसाची रिमझिम File Photo
पिंपरी चिंचवड

Pimpri-Chinchwad Rain Update : पिंपरी चिंचवडला दिलासा, पावसाची रिमझिम

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने झोडपून काढले आहे. काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुणे (pune rain update) जिल्ह्यातील डोंगर भागात व धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. खाली वाहणाऱ्या भीमा आणि मुळामुठा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्‍यामुळे हवेली, दौंड, शिरूर या भागातील नदीपात्रावरील बंधारे व काही ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत. (pimpri-chinchwad floods)

पुण्यातील सध्याची पावसाची स्थिती पाहता जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी दि.४ रोजी रात्रीपासूनच ठिकठिकणच्या पुलावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे. तसेच नदीकाठचे हजारो एकर शेतीक्षेत्र पाण्याखाली गेले असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Pimpri-Chinchwad floods : पावसाची गेल्या  चोवीस तासातील आकडेवारी अशी

दरम्यान गेल्या २४ तासातील पुण्यातील विविध ठिकाणी किती मिमी प्रमाणात पाऊस पडला आहे हे पाहू. पाऊस मिमी (मिलीमीटर)  मध्ये

  • लोणावळा - ८६.५

  • माळिन - ४६.०

  • वडगावशेरी - ३९.५

  • शिवाजीनगर -३८.७

  • चिंचवड - ३७.०

  • पाषाण - ३४.८

  • खेड - ३३.०

  • तळेगाव २८.५

  • दापोडी - २७.५

  • धामधरे - २२.५

  • नारायणगाव - १८.०

  • एनडीए - १७.०

  • राजगुरुनगर १६.५

  • आंबेगाव - १४.०

  • हडपसर - १३.०

  • लवाळे - १३.०

  • हवेली - ११.५

  • दौंड - २.५

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग कमी करून दुपारी २.०० वाजता २१ हजार १७५ क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व आवकनुसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT