पुणे : पुण्यात पावसाचा 'कहर', भारतीय लष्कराचे 105 जवान तैनात

Pune Rain : पुणे : पुण्यात पावसाचा 'कहर', भारतीय लष्कराचे 105 जवान तैनात
Pune Rain: Pune: Heavy rain continues in Pune, 105 soldiers of Indian Army deployed
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे. खडकवासला धरण संग्रहित फोटो
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क | Pune Rain : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सकाळी 11:00 वाजता तो 35002 क्यूसेक्स इतका करण्यात आला. यामध्ये आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार धरणाच्या विसर्गात पुन्हा कमी/जास्त वाढ करण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून भारतीय लष्कराला या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. यामध्ये 105 भारतीय लष्कराचे जवान तैनात केले आहेत. भारतीय लष्कर दलाकडून बचाव कार्यासाठी होडी, ट्यूब, यासं विविध सामग्री आणली आहे.

सकाळी ६ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे...

खडकवासला येथे सात मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्‍या 24 तासात 11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पानशेत वरसगाव येथे 14 मिलिमीटर पाऊस झाला आहे. येरवडा येथे 16 मिलिमीटर पाऊस झाला आहे. मुळशी तालुक्यातील कुंभेरी येथे 54, ताम्हिणी येथे 31 आणि लवासा येथे 17 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news