PMRDA  Pudhari
पिंपरी चिंचवड

PMRDA Projects Stalled: पीएमआरडीएचे सात मोठे प्रकल्प अजूनही रखडले

रिंगरोड, नदी सुधारणा, लोणावळा स्कायवॉकसह अनेक योजना दीड वर्षांनंतरही कागदावरच

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून साधारणत: गेल्या दीड वर्षापूर्वी सात मोठे प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाला होता; मात्र अद्यापही यापैकी एकाही प्रकल्पावर कार्यवाही झालेली नाही. भूसंपादन, निवीदा प्रक्रिया आणि अंतिम अहवाल अशा वेगवेगळया कारणांमुळे हे प्रकल्प अद्याप कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

रिंगरोड : सोळू ते वाघोली काम रखडलेले

वाहतूक कोंडीचा सुटका देणारा जिल्हयातील सर्वाधिक मोठा प्रकल्प म्हणून रिंगरोड कडे पाहिले जाते. त्यात 96 प्रोजेक्ट असून, त्याचा पहिला टप्पा म्हणजे सोळू ते वाघोली या दरम्यान अद्याप पूर्ण होवू शकला नाही. भूसंपादन तसेच, काही शेतकऱ्यांचा विरोध असल्याने हा प्रकल्प अद्याप रखडला असल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षात सोलू ते वडगाव शिदे हा 4.7 किलोमीटरचा पहिला टप्पा आहे. वेगवेगळया विभागाशी संबंधित जागा व भूसंपादन रखडले आहे.

जंक्शन सुधारणा

जिल्हयात 17 ठिकाणी जंक्शन सुधारणा करण्यात येणार होती. जेणेकरुन वाहतूक स्थिती व कोंडी सुधारण्यास मदत होईल. मात्र, यासाठी विस्तृत अहवाल झाला नाही. तसेच, त्यावर कार्यवाही न झाल्याने 2 वर्षाचा हा प्रोजेक्ट कागदावरच आहे. तसेच, पार्किंग संदर्भात मल्टी मॉडेल हबची संकल्पना राबविण्यात आली होती. हा प्रकल्प 370 कोटी रूपये खर्चाचा आहे. प्रत्यक्षात जागाचे संपादन, कायदेशीर अडचणी त्यामुळे हा प्रकल्प देखील प्रकल्प पुढे सरकला नाही.

नदी सुधारणा

नदी सुधारणा प्रकल्पांतर्गत इंद्रायणी, पवना आणि मुळामुठा या महत्त्वाच्या नद्यांची प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच, परिसराचा विकासाच्या दृष्टिने हा प्रकल्प राबविण्यात आला होता. यासाठी पीएमआरडीएला दिल्लीचे दारे ठोठावली देखील लागली होती. मात्र, अद्याप ते प्रत्यक्षात सुरु झालेले नाहीत.

लोणावळा स्काय वॉक

लोणावळा टायगर आणि लायन्स पाईंट येथील ग्लास स्कॉयवॉक, जिल्ह्यातील विविध ठिकाणी 11 फायर स्टेशन, देहू घाट, फुटबॉल टफ, वाघोली वॉटर सप्लाय असे विविध प्रकल्प हे अद्याप कागदावरच आहे.

अनेक प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. काही प्रकल्प हे निविदा प्रक्रियेत आहेत. त्यापैकी काही प्रकल्प हे येत्या वर्षभरात पूर्ण होतील. मेट्रो आणि रिंगरोड प्रकल्पाला गती मिळाली आहे. निश्चित हे प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहेत.
डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT