PMPML Electric Bus Pudhari
पिंपरी चिंचवड

PMPML Electric Bus Battery Problem: पीएमपीच्या ई-बसची बॅटरी लवकर डिस्चार्ज; प्रवाशांना रस्त्यात उतरावे लागते

२० पैकी १३ बसच्या बॅटऱ्या खराब असल्याचे तपासणीत उघड; जादा चार्जिंगमुळे खर्चातही वाढ

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपीएमएल) काही इलेक्ट्रीक बसची बॅटरी वेळेअगोदरच डिस्चार्ज होऊ लागली आहे. त्यामुळे पीएमपीच्या इलेक्ट्रीक बस मार्गावरच बंद पडत आहेत. परिणामी, त्या बसमधील प्रवाशांना मधेच उतरुन पुढचा प्रवास इतर बस किंवा खासगी वाहनांमधून करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप आणि आर्थिंक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

पीएमपीकडून सध्या संचलनात १८०० बस आहेत. त्यापैकी ताफ्यात सध्या साधारण ५३४ वातानुकुलित ई-बस कार्यरत आहेत. मात्र यातील बहूतांश बसेस रस्त्यावर येऊन पाच वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. परिणामी , त्यांच्या बॅटऱ्यांची क्षमता कमालीची घटली असून, बसचे चार्जिंग फेऱ्या पुर्ण होण्याअगोदर उतरत असल्याचे चित्र पिंपरी चिंचवडस शहरात दिसून येत आहे.

२०१८ मध्ये पहिल्या टप्पात पीएमपीच्या तापक्यात नऊ मीटरच्या ५० इलेक्ट्रीक बस दाखल झाल्या आहेत. त्यानतंर ४८४ बस टप्प्याटप्प्याने दाखल झाल्या होत्या. या बसचे विशेषतः पहिल्या टप्पात दाखल झालेल्या बसचे चार्जिंग लवकर उतरत आहे. तसेच, या बसला चार्जिंगसाठी नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. त्यामुळे पीएमपीकडून पहिल्या टप्पात दाखल झालेल्या इलेक्ट्रीक बसची तपासणी केली. त्यावेळी तपासणीमध्ये २० पैकी १३ बसच्या बॅटऱ्या खराब झाल्याचे आढळून आले होते.

जास्त वेळ चार्जिंग लावल्यास आर्थिक फटका : इलेक्ट्रीक बस एका चार्जिंगमध्ये २३० ते २५० किलोमीटर जाणे अपेक्षित आहे. तसेच या चार तासांमध्ये पुर्ण चार्ज व्हावा लागतात. तसेच दिवसा त्यांना अर्धा तास चार्जिंगसाठी वेळ दिला जातो. पण या बसला चार्जिंगसाठी जास्त वेळ लागतो. तसेच, दिवसा चार्जिंग वेळेअगोदर संपत असल्यामुळे दिवसा देखील जास्त वेळ बस चार्जिंगला लावावी लागत आहे. तसेच महावितरणाचे वीजेचे रात्रीची दर व दिवसाचे दर वेगवेगळे आहेत. दिवसा जास्त वेळ चार्जिंग लावल्यास आर्थिक फटका बसत आहे.

ई-बसच्या चार्जिंग व्यवस्थेबाबत प्रशासनाकडून संबंधित आगारातील देखभाल अभियंत्यांना वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतात. ही व्यवस्था सुरक्षित व सुरळीत राहील, याची प्रशासनाकडून सातत्याने काळजी घेतली जाते. एखादी मोठी तांत्रिक अडचण उद्भवल्यास त्याचा अपवाद वगळता, ई-बसच्या देखभाल-दुरुस्तीबाबत शासनाकडून नियमितपणे आवश्यक ती दक्षता घेतली जाते.
नागेश गायकवाड, जनसंपर्क अधिकारी पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT