Vegetable Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Vegetable Market Prices: पिंपरी भाजी मंडईत पालेभाज्यांचे दर तेजीत; आवक घटल्याने बाजारभावात वाढ

कोथिंबीर, मेथीपासून लसूणपर्यंत किमती वाढल्या; मोशी उपबाजारातही आवक व दरात चढ-उतार कायम

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. २१) रोजी बाजारात गेल्या आठवड्याप्रमाणे फळभाज्यांचे दर स्थिर होते. पालेभाज्यांची आवक कमी झाल्यामुळे पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. घेवडा, राजमा, पावट्याचे दर तेजीतच आहेत . तर लसूण 140 - 180 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. कोथिंबीर, मेथीची जुडी 30 - 35 रुपयांना विक्री केली जात आहे. आवक कमी असल्याने दर वाढले आहेत. पापडी, पडवळ, शेवगा आणि आले 100 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. वांगी ६० तर दोडका 80 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

फळभाज्यांचे दर :

रविवारी बाजारात गवार 70 रुपये किलो, शेवगा 70, टोमॅटो 25, भेंडी 70, फ्लॉवर 50, कोबी 30, मिरची 50, गाजर 30, शिमला 80, लसूण 100 - 120, वांगी 70, काकडी 40, कारले 80, कांदे 20 - 25 रुपये प्रति किलो, बटाटा 25- 30 रुपये, बिन्स 100, पावटा 100, लाल भोपळा 40, घोसाळी 50, दोडका 70 रुपये, तोंडली 50, बीट 40, दुधी 50, घेवडा 100 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

पिंपरी बाजारातील दर: पाले भाज्यांचे दर (रु.) प्रति जुडी

कोथिंबीर 25- 30 रुपये, मेथी 35, पालक 20, शेपू 30, राजगिरा 25, पुदिना 20, मुळा 40, चवळई 20, लाल माठ 15, कांदापात 40, करडई 20, आळू पाने 15 रूपये जुडी, आंबट चुका 25 रुपये जुडी.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)

शेवगा 100 रुपये, गवार 80, वाटाणा 120, पावटा 100, तोंडली 60, बीट 50, दोडका 80, कारली 60, भरताची वांगी 40, भेंडी 60, मिरची 60, फ्लॉवर 80, कोबी 50, वांगी 60, घोसाळे 80, पडवळ 100, दुधी भोपळा 80, पापडी 100, पावटा 100, परवल 100, सुरण 80, मद्रास काकडी 80 रूपये, आरबी 80 रूपये किलो, सिमला 80 रुपये, राजमा 100, बिन्स 120- 140, राजमा 100 रुपये, गाजर 50, रताळी 70, टोमॅटो 40, काकडी 50, तर बीट 50 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा 12, बटाटा 10, लसूण 100, आले 80, भेंडी 45, गवार 45, टोमॅटो 25, वाटाणा 150, घेवडा 100, दोडका 45, हिरवी मिरची 40, दुधी भोपळा 25, काकडी 25, कारली 45, गाजर 30, फ्लॉवर 25, कोबी 10, ढोबळी 50, वांगी 20, शेवगा 45, घोसाळी 35, लिंबू 45, मका कणीस 50- 60 रुपये प्रतिकिलो दर होते.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी 4132, पालेभाजी 47400 (गड्डी), फळे आवक 563, कांदा 762, बटाटा 735, आले 42, लसूण 10, भेंडी 105, गवार 47, टोमॅटो 648, वाटाणा 6, घेवडा 12, दोडका 26, हिरवी मिरची 151, दुधी भोपळा 69, काकडी 130, कारली 14, डांगर 109, गाजर 135, फ्लॉवर 239, कोबी 234, वांगी 157, ढोबळी 72, बीट 18, शेवगा 68, लिंबू 49, मका कणीस 127, तोंडली 10, रताळी 22 क्विंटल इतकी आवक झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT