Tomato And Cucumber Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Vegetable Price Drop: पिंपरीत भाज्यांचे दर घसरले; गॅसटंचाईमुळे हॉटेलची मागणी कमी

टोमॅटो, काकडी, कोबी स्वस्त; बाजारात आवक वाढल्याने दरात घसरण

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: आखाती देशांतील गॅसटंचाईचा फटका बसत असल्याने हॉटेल व्यावसायिकांकडून भाज्यांची खरेदी कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री मंडईत भाज्यांचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. टोमॅटो, काकडी, कोबीची आवक वाढल्याने दर घटले आहेत.

काकडी 40 वरून 20 रुपये किलोने विक्री केली जात आहे. शेवगा 80 वरून 40, टोमॅटो 40 वरून 20 ते 25, मिरची 100 वरून 70 रुपये प्रतिकिलोने विक्री केली जातआहे. उन्हाळ्यामध्ये लिंबूला अधिक मागणी असते. मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजारात रविवार (दि. 5) फळभाज्यांची आवक गत आठवड्यापेक्षा घटली आहे. 4 हजार 299 क्विंटल, तर, पालेभाज्यांची 53 हजार 400 गड्या आणि फळांची 2 हजार 19 क्विंटल आवक नोंदवली गेली.

छोटे विक्रेत्यांची मागणी घटली

पिंपरी बाजारपेठेत शहरातील अनेक छोटे विक्रेते भाजी खरेदी करून पुढे उपनगरामध्ये विकतात. दरम्यान, या छोट्या विक्रेत्यांकडून देखील मागणी कमी झाली आहे. हे छोटे विक्रेते परिसरातील हॉटेलमध्ये, खानावळीमध्ये भाज्या पुरवतात. मात्र, काही प्रमाणात खानावळी बंद झाल्याने त्यांच्याकडून पुढील ऑर्डर देखील कमी झाली आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपये)

कांदा : 20 रुपये, बटाटा : 25, लसूण : 100 ते 140, आले : 60, भेंडी : 40 ते 50, गवार : 100, टोमॅटो : 20 ते 25 , मटार : 140, घेवडा : 70 ते 80, राजमा : 70, दोडका : 60, मिरची : 70 ते 80 , दुधी भोपळा : 30, काकडी : 20 ते 25, कारली : 50 ते 60, डांगर : 30 ते 40, गाजर : 50, पापडी : 60, पडवळ : 80, फ्लॉवर : 30 ते 40, कोबी : 20, वांगी : 40, ढोबळी : 70, बीट : 30, पावटा : 60, वाल : 60, रताळी : 60, शेवगा : 40, चवळी : 40, घोसाळी : 50 ते 60, कडिपत्ता : 100, लिंबू : 100 ते 120, मका कणीस : 40, सुरण : 60 ते 70, तोंडली : 80, आरवी : 60, कैरी : 50, कोहळा : 50 ते 60 रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहे.

पालेभाज्यांचे दर (प्रति गड्डी रुपयांत)

कोथिंबीर : 20, मेथी : 20, शेपू : 20, कांदापात : 20 ते 25, पालक : 20, पुदिना : 5 , आंबट चुका : 20, मुळा : 20 ते 25, आळू : 10, लाल माठ : 20, आंबाडा : 20 रुपये.

फळांचे भाव (प्रति किलो रूपयांत)

सफरचंद : 200 ते 300, मोसंबी : 100, संत्रा : 160 ते 200, डाळिंब : 200 ते 240, पेरू : 100, पपई : 60, चिकू : 60, अननस : 100 ते 120, आवळा : 80 ते 100, पेर : 240, अंजीर : 200, खरबूज : 50, कलिंगड : 20, द्राक्षे : 100, आंबा : 200 ते 250 रुपयांत विक्री केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT