Pimpri Illegal Business Crackdown: पिंपरीत अवैध धंद्यांवर पोलिसांचा हल्लाबोल; जुगार, दारू, वेश्याव्यवसायावर कारवाई

शहरभर धाडसत्र; रोख रक्कम, साहित्य जप्त, आरोपींवर गुन्हे दाखल
Police
PolicePudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी हल्लाबोल चढवला असून जुगार, हातभट्टी दारू आणि वेश्याव्यवसायाशी संबंधित प्रकारांवर सलग कारवाया करण्यात आल्या आहेत. शहराच्या विविध भागांत छापे टाकत पोलिसांनी आरोपींना अटक केली, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, जुगार साहित्य आणि कच्चे रसायन जप्त केले आहे. या कारवायांमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Police
Pimpri Pan Shop Drug Racket: पिंपरीत पानात नशायुक्त पावडरचा धक्कादायक प्रकार; पोलिसांची धडक कारवाई

शेल पिंपळगाव येथील कृषी मार्केटसमोरील आदित्य ऑटोगॅरेजमध्ये सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत नागनाथ कुंडलीक चाटे (रा. कुरुळी), विश्वास विनायक ओव्हाळ (रा. चाकण) आणि राहुल मदनराव वानखेडे (रा. मेदनकरवाडी, चाकण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गॅरेजमध्ये ‌‘कल्याण‌’, ‌‘मुंबई‌’ आणि ‌‘मिलन‌’ नावाचा मटका जुगार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी 11 हजार 315 रुपये रोख रक्कम आणि जुगारासाठी लागणारे साहित्य जप्त केले. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Police
Pune Metro Line 3 Delay: पुणे मेट्रो मार्गिका 3 दिरंगाईवर कारवाईचा इशारा; कामाला गती देण्याचे आदेश

याच दिवशी कांडगे वस्ती, चाकण येथे भाड्याच्या खोलीत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावरही पोलिसांनी धाड टाकली. चंद्रेश रवि नागेश्वर (41) आणि दशरथ सोमा वाघोले (65) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 4 हजार 505 रुपये किमतीची जुगाराची साधने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. वाकड परिसरातही सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. डांगे चौक ते भूमकर चौक रोडवर रस्त्याच्या कडेला लोकांना जमवून ‌‘सोरट‌’ जुगार खेळवताना ताज मोहम्मद शहा (40, रा. भारतनगर, पिंपरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Police
Pimpri Chinchwad Garbage Issue: पिंपरी-चिंचवडमध्ये कचऱ्यावर कारवाई; 1.15 कोटींचा दंड वसूल

दरम्यान, नवीन फुले नगर, पिंपरी येथील मोकळ्या मैदानात पैशावर ‌‘तीन पानी‌’ जुगार खेळणाऱ्या सात जणांवरही संत तुकारामनगर पोलिसांनी कारवाई केली. प्रतिक बाळकृष्ण बगाटे, अमित दिलीप गायकवाड, किरण मारुती कांबळे, पंकज भागवत ओव्हाळ, दत्ता रवि हजारे, रोहित प्रभाकर शिंदे आणि सुरज विजय घोडके अशी आरोपींची नावे असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खात्रीशीर माहितीच्या आधारे छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

अवैध धंद्यांविरोधातील कारवाया केवळ जुगारापुरत्याच मर्यादित न राहता इतर क्षेत्रातही सुरू असल्याचे दिसून आले. देहुफाटा परिसरात सार्वजनिक ठिकाणी अलील हावभाव करून वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या एका महिलेवर दिघी पोलिसांनी कारवाई केली. योगीराज लॉजजवळ शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. संबंधित महिलेविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police
Indrayani River Pollution: देहूगाव इंद्रायणी नदी अस्वच्छतेच्या विळख्यात; वारकऱ्यांची गैरसोय

तसेच, तळेगाव एमआयडीसी परिसरात गावठी दारू निर्मितीसाठी साठवून ठेवलेल्या कच्च्या रसायनावर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. कंजार भट वस्ती, आंबी येथे ओढ्याच्या बाजूला ठेवलेले सुमारे 3 हजार लिटर कच्चे रसायन जप्त करण्यात आले. या प्रकरणात इतासना पुरुषोत्तम राठोड हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची टीम येताच आरोपी महिला घटनास्थळावरून पळून गेली असून तिचा शोध सुरू आहे.

पोलिसांचा आक्रमक पवित्रा

या सलग कारवायांमुळे पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. जुगार, हातभट्टी दारू आणि वेश्याव्यवसायासारख्या गैरप्रकारांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून पुढील काळात अशा कारवाया अधिक तीव्र करण्याचा इशाराही पोलिस प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.

अवैध धंद्यांविरुद्ध कठोर धोरण अवलंबत पोलिसांकडून ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई सुरू आहे. जुगार, हातभट्टी दारू व वेश्याव्यवसायासारख्या बेकायदेशीर प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. अशा प्रकरणांची माहिती मिळताच तातडीने छापेमारी करून संबंधितांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news