Fenugreek and Coriander Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी भाजी मंडईत दर स्थिर; बिन्स तेजीत तर मेथी-कोथिंबीर स्वस्त

लालबहादूर शास्त्री बाजारात फळभाज्यांची आवक चांगली; कांदा-बटाटा दर स्थिर

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. 24) फळभाज्यांचे दर स्थिर होते. फक्त बिन्सचे दर तेजीत होते. तर गवार, शेवगा स्वस्त झाला होता. मेथी, कोथिंबीरचे दर उतरल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

पालेभाज्यांच्या दरात किंचित घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कोथिंबीर व मेथीची जुडी 30 रूपये दराने होती. गवार आणि शेवगा 50-60 रूपये तर वांगी, फ्लॉवर 40-50 रूपये किलो दराने मिळत होते. मिरची 50, कर्नाटक कैरीचा 50-60 रुपये किलो दर होता. कांदे 100 रूपयांना 5 किलो, लसूण 100-150 आणि आले 80-90 रूपये किलो दराने उपलब्ध होते.

फळभाज्यांचे किलोचे दर पुढील प्रमाणे (रुपयांत)

रविवारी पिंपरी बाजारात गवार 50, शेवगा 40, टोमॅटो 25, भेंडी 50, फ्लॉवर 30, कोबी 25, मिरची 50, गाजर 25, शिमला 50, लसूण 100-120, आले 70, वांगी 40, काकडी 30, कारले 40, कांदे 20-25, बटाटा 25-30, बिन्स 100, पावटा 80, लाल भोपळा 30, घोसाळी 60, दोडका 30, तोंडली 70, बीट 40, दुधी 30, घेवडा 90 रूपये.

पिंपरी बाजारातील पालेभाज्यांचे दर (रुपयांत) प्रतिजुडी

कोथिंबीर 25, मेथी 20, पालक 25, शेपू 25, राजगिरा 25, पुदिना 10, मुळा 25, चवळई 15, लाल माठ 15, कांदापात 25, करडई 15, आळू पाने 15, आंबट चुका 20, गवती चहा 10.

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो, रुपयांत)

कांदा 7, बटाटा 12, लसूण 75, आले 35, भेंडी 20, गवार 60, टोमॅटो 25, वाटाणा 90, घेवडा 90, दोडका 40, हिरवी मिरची 35, दुधी भोपळा 30, काकडी 25, कारली 35, गाजर 30, फ्लॉवर 20, कोबी 9, वांगी 25, बीट 30, शेवगा 35, घोसाळी 30, लिंबू 100, मका कणीस 50.

मोशी उपबाजारातील आवक (क्विंटलमध्ये)

फळभाजी : 4823, पालेभाजी : 56400 (गड्डी), फळे आवक : 391, कांदा 821, बटाटा 1510, आले 63, लसूण 35, भेंडी 123, गवार 52, टोमॅटो 541, वाटाणा 13, घेवडा 23, दोडका 8, हिरवी मिरची 104, दुधी भोपळा 55, काकडी 185, कारली 6, गाजर 89, फ्लॉवर 332, कोबी 216, वांगी 130, ढोबळी 70, बीट 17, शेवगा 72, लिंबू 58, मका कणीस 68, तोंडली 5, रताळी 17.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT