Vegetable Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Vegetable Market Prices: पिंपरीत भाज्यांचे दर घसरले; पालेभाज्या मात्र महागल्या

आवक घटल्याने पालेभाज्यांचे भाव वाढले; लालबहादूर शास्त्री भाजी मंडईतील चित्र

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. 3) बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये भाज्यांच्या दरात घट झाली होती. उन्हामुळे पालेभाज्यांची आवक कमी असल्यामुळे पालेभाज्यांचे दर वाढले होते.

बाजारात भेंडी, गवार, शेवग्याचे दर कमी झाले आहेत. कोथिंबीर व मेथीची जुडी 30 रुपये दराने विक्री केली जात आहे. बीन्स व वाटाणा 100 ते 140 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. फ्लॉवर 30-40 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. मिरची 60, कर्नाटक कैरी 50 ते 60 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. कांदे 100 रुपयांना पाच किलो विक्री केली जात आहे. लसूण 100 - 150 रुपये तर आले 60 - 80 रुपये किलो दराने उपलब्ध केली जात आहे.

फळभाज्यांचे दर पुढील प्रमाणे :

रविवारी बाजारात गवार 40-70 रुपये किलो, शेवगा 40 -70, टोमॅटो 30, भेंडी 50, फ्लॉवर 40, कोबी 30, मिरची 50, गाजर 30, शिमला 50- 60, लसूण 100 - 120, आले 60 -80, वांगी 30 -40, काकडी 40, कारले 50, कांदे 20 - 25 रुपये किलो, बटाटा 25- 30 रुपये किलो, पावटा 70, लाल भोपळा 30, घोसाळी 60, दोडका 70 रुपये, तोंडली 50-60 रुपये, बीट 50, दुधी 40 तर घेवडा 60 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

पिंपरी बाजारातील दर

पाले भाज्यांचे दर (रु.) प्रति जुडी कोथिंबीर 30 रुपये, मेथी 35, पालक 20, शेपू 20, राजगिरा 30, पुदिना 10, मुळा 40, चवळई 30, लाल माठ 15, कांदापात 30, करडई 15, आळू पाने 10 रूपये जुडी, चुका 30 रूपये असे दर आहेत.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)

शेवगा 60 रुपये, गवार 60, रुपये, वाटाणा 120 - 140, पावटा 70, तोंडली 60 रुपये, बीट 60, दोडका 50, कारली 60, भरताची वांगी 50, भेंडी 50 रुपये, मिरची 70, फ्लॉवर 40, कोबी 30, वांगी 60, घोसाळे 60, पडवळ 100, दुधी भोपळा 50, पापडी 60, परवल 80, सुरण 80 रुपये, मद्रास काकडी 40 रुपये, आरबी 50 रुपये, सिमला 60 रुपये, राजमा 60, बिन्स 100 रुपये, गाजर 50, रताळी 60 रुपये, टोमॅटो 30, काकडी 50 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा 7, बटाटा 9, लसूण 90, आले 35, भेंडी 35, गवार 45, टोमॅटो 9, वाटाणा 90, घेवडा 35, दोडका 30, हिरवी मिरची 35, दुधी भोपळा 25, काकडी 15, कारली 30, गाजर 30, फ्लॉवर 15, कोबी 10, वांगी 25, बीट 30, शेवगा 35, घोसाळी 30, लिंबू 75, मका कणीस 100 रुपये प्रतिकिलो असे दर होते.

मोशी उपबाजारातील दर:

आवक (क्विंटल) फळभाजी 3872, पालेभाजी 44300 (गड्डी), फळे आवक 1657, कांदा 770, बटाटा 340, आले 67, लसूण 10, भेंडी 130, गवार 34, टोमॅटो 692, वाटाणा 13, घेवडा 42, दोडका 24, हिरवी मिरची 176, दुधी भोपळा 118, काकडी 198, कारली 25, डांगर 40, गाजर 114, फ्लॉवर 335, कोबी 238, वांगी 118, ढोबळी 58, बीट 18, शेवगा 98, लिंबू 41, मका कणीस 48, तोंडली 0, रताळी 3 क्विंटल अशी आवक झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT