PCMC Water Theft Case: पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी चोरीवर मोठी कारवाई; 42 नळजोड बंद

चिखली-मोरेवस्ती भागात अनधिकृत जोडणी उघड; महापालिकेचा कठोर इशारा
Water Supply
Water SupplyPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात पाणी चोरीचा नवीन प्रकार उघडकीस आला आहे. एक अधिकृत आणि एक अनधिकृत नळजोड घेऊन अनधिकृत नळजोडाद्वारे पाणी चोरणाऱ्या शहरातील चिखली, मोरेवस्ती भागातील नळजोडधारकांना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दणका दिला आहे. असे एकूण 42 अनधिकृत नळजोड खंडीत केले आहेत. पुन्हा अनधिकृत नळजोड घेतल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

Water Supply
Mumbai Pune Expressway Traffic Relief: मिसिंग लिंकचा प्रभाव; मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे कोंडीमुक्त

शहरात मागील साडेसहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. 35 टक्के पाणी गळती, चोरी होते. वाढत्या लोकसंख्येनुसार पाणी उपलब्ध होत नसल्याने दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली असून, अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

Water Supply
Mumbai Pune Expressway Missing Link: मिसिंग लिंक उद्घाटनावेळी मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण कोंडी

शहरातील विविध भागातून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. हौसिंग सोसायटयाना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाने अनधिकृत नळजोडधारक आणि नळजोडाला थेट मोटार पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Water Supply
PCMC Commissioner YCM Hospital Visit: आयुक्त डॉ. सूर्यवंशींची वायसीएम रुग्णालयाला अचानक भेट

तक्रारींमुळे दोन नळजोडांचा प्रकार उघडकीस

महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील चिखली, मोरेवस्ती भागात अर्धा, एक गुंठ्यात बैठी घरे नागरिकांनी बांधली आहेत. या भागात गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत्या. याची दखल घेत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने परिसरात पाहणी केली. यामध्ये काही नागरिकांकडे एक अधिकृत आणि एक अनधिकृत नळजोड असल्याचे निदर्शनास आले.

Water Supply
Chakan Jewellers Theft Case: चाकणमध्ये ज्वेलर्स दुकान फोडून 77 लाखांची चोरी

अधिकृत नळजोडाचे पाणी मीटर बंद ठेवून अनधिकृत नळजोडामार्फत पाणी चोरी केली जात होती. असे अनधिकृत असलेले 42 नळजोड पाणीपुरवठा विभागाने तोडले आहेत. तसेच यापुढे बेकायदा नळजोड घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजयसिंह भोसले यांनी दिला आहे.

पाणी चोरी खपवून घेणार नाही

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची मागणी वाढली आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी शहरातील बेकायदा नळजोडण्या शोधून त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. पाणी चोरी खपवून घेतली जाणार नाही, असे महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news