पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. 28) जून रोजी बाजारात गेल्या आठवड्याप्रमाणे फळभाज्यांचे दर स्थिर होते. पालेभाज्यांची आवक कमी झाल्यामुळे पालेभाज्यांचे दर वाढले होते. वाटाणा, घेवडा, राजमा, पावटा दर तेजीतच आहेत . तर भेंडी, फ्लॉवर, कोबी, वांगी स्वस्त झाले आहेत. लसूण 140 - 180 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. कोथिंबीर, मेथीची जुडी 20 - 25 रुपये दराने विक्री केली जात आहे. आवक कमी असल्याने दर वाढलेले आहेत.
फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे
रविवारी बाजारात गवार 60 रुपये किलो, शेवगा 70 रुपये किलो होता. टोमॅटो 25 रुपये, भेंडी 50 रुपये किलो, फ्लॉवर 50रुपये, कोबी 25 रुपये, मिरची 50 रुपये, गाजर 30 रुपये, शिमला 50 रुपये, लसूण 160 - 170 रुपये, आले 70 रुपये, वांगी 30 रुपये, काकडी 40 रुपये, कारले 50, कांदे 20 - 25 किलो, बटाटा 25- 30 रुपये किलो, बिन्स 100 रुपये किलो, पावटा 100, लाल भोपळा 40 रुपये, घोसाळी 50, दोडका 50 रूपये, तोंडली 40 रुपये, बीट 30 रुपये, दुधी 40, घेवडा 100 रुपये होता.
पिंपरी बाजारातील दर पाले भाज्यांचे दर (रु.) प्रतिजुडी
कोथिंबीर 30 रुपये, मेथी 30 रुपये, पालक 20 रुपये, शेपू 30 रुपये, राजगिरा 25, पुदिना 15 रुपये, मुळा 30 रुपये, चवळई 20, लाल माठ 15, हिरवा माठ 15, करडई 20, कांदापात 30 रुपये, करडई 20, आळू पाने 15 रुपये जुडी, आंबट चुका 20 रुपये, गवती चहा 10,
फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)
शेवगा 80 रुपये, गवार 70 रुपये, वाटाणा 120, पावटा 120, तोंडली 60 रुपये, बीट 30, दोडका 60, कारली 60, भरताची वांगी 40, भेंडी 60 रुपये, मिरची 70, फ्लॉवर 60, कोबी 30, वांगी 40, घोसाळे 50- 60, पडवळ 80, दुधी भोपळा 30, पापडी 100, पावटा 100, परवल 100, सुरण 80 रुपये, मद्रास काकडी 80 रुपये, आरबी 80 रुपये किलो, सिमला 60 रुपये, राजमा 120, बिन्स 120- 140, गाजर 50 रुपये किलो, आरवी 80, रताळी 70 रुपये, टोमॅटो 40 रुपये, काकडी 50 रुपये किलो.
मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)
कांदा 14, बटाटा 10, लसूण 80, आले 45, भेंडी 35, गवार 45, टोमॅटो 25, वाटाणा 140, घेवडा 80, दोडका 45, हिरवी मिरची 35, दुधी भोपळा 20, काकडी 25, कारली 45, गाजर 30, फ्लॉवर 25, कोबी 15, ढोबळी 45, वांगी 25, शेवगा 45, घोसाळी 35, लिंबू 45, मका कणीस 50- 60 रू प्रतिकिलो दर होते.
मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल) : फळभाजी 4005, पालेभाजी 49400 (गड्डी), फळे आवक 528, कांदा 841, बटाटा 531, आले 42, लसूण 7, भेंडी 120, गवार 38, टोमॅटो 498, वाटाणा 12, घेवडा 16, दोडका 38, हिरवी मिरची 146, दुधी भोपळा 49, काकडी 242, कारली 17, डांगर 38, गाजर 66, फ्लॉवर 238, कोबी 289, वांगी 218, ढोबळी 91, बीट 10, शेवगा 69, लिंबू 59, मका कणीस 163, तोंडली 5, रताळी 15 क्विंटल इतकी आवक झाली आहे.
वटपौर्णिमेसाठी बाजारात आंब्यांची आवक हापूस, नीलम, दशेरीला मागणी
पिंपरी फळबाजारात वटपौर्णिमेच्या निमित्त आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे आंब्याचे दर देखील वाढले आहेत. हापूस 200 रुपये किलो, नीलम 150 रुपये किलो, दशेरी, लंगडा 100 रुपये किलोने विक्री केली जात आहे.
जून व जुलै महिन्यात येणारे दिल्ली येथील देशरी आणि बनारस येथून लंगडा आंब्याची आवक बाजरपेठेत व्हायला सुरुवात झाली आहे. वटपौर्णिमेला पूजनासाठी आंबे हे प्रामुख्याने विकत घेतले जातात. त्यामुळे बाजारात विविध प्रकारच्या जातीचे आंबे दिसत आहेत.
फळांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे
सफरचंद 200 - 280 रुपये, मोसंबी 80 - 100, संत्री 120 - 160, डाळिंब 80 - 200, पेरू 60 - 80 रुपये, अंजीर 100 रुपये, पपई 40, दाक्षे 100, बदाम आंबा150, लालबाग 140 - 200, कर्नाटक हापूस 200, केळी 50, अननस 50 - 100 प्रतिनग, पिअर 200 रुपये, ड्रॅगनफ्रुट 50 ते 80 रुपये, किवी 100, चिकू 100 रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे.