पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. 9) ऑगस्ट रोजी बाजारात फळभाज्यांमध्ये भेंडी, शिमला, रताळी यांची आवक वाढली असून दरही कमी झाले आहेत. तर पालेभाज्यांच्या दरातही घसरण झाली असून कोथिंबीरची जुडी १० रुपये दराने विक्री केली जात आहे; तसेच रानभाजी कर्टुलीची मोठी आवक झाली असूनही ३०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. एकादशीमुळे रताळ्यांची आवक झाली असून ८० रुपये प्रति किलोप्रमाणे ग्राहक खरेदी करत आहेत.
फळभाज्यांचे दर :
रविवारी बाजारात टोमॅटो ३०, भेंडी ६०, फ्लॉवर ४०, कोबी ३०, मिरची ६० रुपये, गाजर ४०, शिमला ६०, लसूण १८० - २००, आले १२० - १४०, वांगी ४०, काकडी ३०, कारले ६०, कांदे २५ -३० रुपये किलो, बटाटा २५ - ३० रुपये किलो, बिन्स १०० रुपये किलो, पावटा ८०, लाल भोपळा ५०, घोसाळी ५०, दोडका ६०, तोंडली ६०, बीट ४० रूपये, दुधी भोपळा ५०, गवार ८० रुपये, शेवगा १००, घेवडा १०० रुपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री केली जात आहे.
पिंपरी बाजारातील दर पाले भाज्यांचे दर (रु.) प्रति जुडी
कोथिंबीर १० - १५ रुपये, मेथी २०, पालक २०, शेपू १५, राजगिरा २०, पुदिना १५, मुळा २५, चवळई १५, लाल माठ १५, हिरवा माठ १५, करडई २०, कांदापात २५, करडई १५, आळू पाने १० रुपये जुडी, आंबट चुका १५ रुपये.
फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)
शेवगा ११० रुपये, गवार १००, पावटा ८० - ९०, तोंडली ८०, बीट ४० - ५०, दोडका ७०, कारली ७०, भरताची वांगी ५०, भेंडी ७०, मिरची ७०, फ्लॉवर ५०, कोबी ३०, वांगी ५०, घोसाळे ५०, पडवळ ५०, दुधी भोपळा ५०, पापडी ९०, पावटा १००, सुरण ९० रूपये, मद्रास काकडी ३० रुपये, सिमला ७०, राजमा १०० - १२०, बिन्स १००, गाजर ५०, रताळी ८० रुपये, तर टोमॅटो ४० रुपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री केली जात आहे.
मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)
कांदा १७, बटाटा १०, लसूण १००, आले ३५ , भेंडी २५, गवार ४५, टोमॅटो १५, वाटाणा १००, घेवडा ४५, दोडका ३५, हिरवी मिरची ३५, दुधी भोपळा २५, काकडी १५, कारली ३५, गाजर २५, फ्लॉवर १२, कोबी १०, ढोबळी ३०, वांगी ३०, शेवगा ४५, घोसाळी ३०, लिंबू २५, मका कणीस १०० रुपये प्रतिकिलो दर होते.
मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)
फळभाजी ४९४८, पालेभाजी ४८३०० (गड्डी), फळे आवक ५५१, कांदा ६९८ , बटाटा १४९५, लसूण २, आले ४८, , भेंडी ९०, गवार ३२, टोमॅटो ६६१, वाटाणा १४, घेवडा ४२, दोडका २३, हिरवी मिरची ११५, दुधी भोपळा ६७, काकडी २३१, कारली ९७, डांगर १५२, गाजर १२५, फ्लॉवर २५८, कोबी २१९, वांगी ९०, ढोबळी ११२, बीट ११, शेवगा ६५, लिंबू १०९, मका कणीस ६७, तोंडली ५, रताळी २ क्विंटल इतकी आवक झाली आहे.
पिंपरी फळ बाजारात डाळींब आणि सफरचंदाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. डाळींब प्रतिकिलो १०० - १५० रुपये आणि सफरचंद २०० - २५० रुपये किलो दर असल्याने इतर फळांऐवजी नागरिकांचा कल डाळींब तसेच सफरचंद खरेदीकडे दिसून येत आहे.
ऐरवी डाळींबाचे भाव जास्त असतात. त्यामुळे नागरिक कमी प्रमाणात खरेदी करतात; मात्र सध्या डाळींबाची मोठ्या प्रमाणत आवक होत असल्याने भावही कमी झाले आहेत. बाजारात पपई आणि अननस फळांना देखील मागणी आहे. पपई ५० - ६० रुपये किलो तर अननस १०० - १२० प्रतिनग उपलब्ध आहेत.
फळांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे
सफरचंद २०० - २५० रुपये, मोसंबी १५० - २०० , संत्री २०० , डाळिंब १०० - १५० , पेरू १०० रुपये, अंजीर १०० रुपये, पपई ५० - ६० रुपये, केळी ५० - ६० रुपये डझन, अननस १२० प्रतिनग, पिअर २६० रुपये, ड्रॅगनफ्रुट १०० रुपये, किवी १२० - १३०, तर चिकू ८० - १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे.