CCTV Camera Pudhari
पिंपरी चिंचवड

SSC HSC Exam CCTV: दहावी-बारावी परीक्षांसाठी सीसीटीव्ही सक्तीचे; पिंपरीत 90 टक्के केंद्रे सज्ज

कॉपिमुक्त अभियानांतर्गत राज्य मंडळाचा कडक निर्णय; सीसीटीव्ही नसलेल्या केंद्रांवर कर्मचाऱ्यांची अदलाबदल शक्य

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य मंडळाने कॉपिमुक्त अभियानांतर्गत सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य केले आहेत. या नियमानुसार प्रत्येक वर्गात कॅमेरा असणे सक्तीचे केल्यामुळे शहरातील 90 टक्के केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध केली आहे.

राज्य मंडळामार्फत 2025-26 साठी बारावीची परीक्षा 10 तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीला होणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान किती परीक्षा केंद्रांवरील परीक्षागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा कार्यन्वित आहे, याची चाचपणी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत सुरू केली आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेराची सुविधा उपलब्ध असेल, त्या केंद्रांनाच मान्यता दिली जाणार आहे. याबाबत यंदा मंडळामार्फत परीक्षा केंद्रावरील परीक्षागृहांमध्ये सीसीटीव्हीची सुविधा आहे की, नाही यावर अधिक भर दिला जात आहे.

सर्व कर्मचाऱ्यांची अदलाबदल

राज्य मंडळामार्फत इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षांबाबत चर्चा करण्यासाठी राज्य मंडळ व अनेक राज्य व विभागीय शिक्षक, मुख्याध्यापक संघटना पदाधिकारी यांच्या सहविचार सभा राज्य मंडळ कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदली संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी सरसकट सर्व परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल न करता ज्या केंद्रावर सीसीटीव्ही उपलब्ध होणार नाहीत, अशा केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळण्याची विनंती केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT