पिंपरी: गेल्या निवडणुकीत भाजपाचे चंद्रकांत नखाते, बाबासाहेब त्रिभुवन, सुनिता तापकीर आणि सविता खुळे असे भाजपाचे पॅनेल विजयी झाले होते. यंदा पुन्हा प्रभागात वर्चस्व मिळविण्यासाठी भाजपाने पावले उलचली आहेत. तर, राष्ट्रवादी काँग््रेाससह विरोधी पक्षांनीही विजयासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
भाजपाकडे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, राज तापकीर, बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसेविका सविता खुळे, सुनिता तापकीर यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासकडून माजी नगरसेवक कैलास थोपटे, अनिता कैलास तापकीर, सागर कोकणे, अश्विनी चंद्रकांत तापकीर व इतर इच्छुक आहेत. तसेच, विशाल भालेराव, युवराज दाखले, अनिता तांबे, विनोद तापकीर, उल्हास कोकणे व इतर काही जण इच्छुक आहेत. भाजपाकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो. चंद्रकात नखाते व राज तापकीर हे सासरे व जावई या प्रभागातून इच्छुक आहेत. कोणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. तर, राष्ट्रवादी काँग््रेास प्रभाग पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्नात आहे.
प्रभागातील परिसर
तापकीरनगर, श्रीनगर, शिवतीर्थनगर, बळीराम गार्डन, रहाटणी गावठाण, तांबे शाळा परिसर, सिंहगड कॉलनी, रायगड कॉलनी, लक्ष्मीबाई तापकीर शाळा परिसर, एनएनबीपी स्कूल, रॉयल ऑरेंज काऊंटी, आकाशगंगा सोसायटी आदी.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा
प्रभागात डीपीतील रस्ते विकसित करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रहाटणी चौकात उभारण्यात आला आहे. तसेच, छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. अर्बन स्ट्रीट डिजाईनने रस्ते विकसित केले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. जुन्या ड्रेनेजलाईनमुळे तुंबण्याचे प्रकार वाढले होते. ते रोखण्यासाठी नव्याने ड्रेनेजलाईन टाकण्यात आली आहे. तसेच, जलवाहिनी टाकण्यात आली आहे. बॅडमिंटन कोर्ट विकसित करण्यात आले आहे. तसेच, स्मशानभूमी अद्ययावत करण्यात आली आहे. पथदिव्यांचे खांब उभारण्यात आले आहेत. चौकांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. महापालिका शाळेच्या वर्गखोल्या वाढविण्यात आल्या आहेत. नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
प्रभागातील जागांचे आरक्षण
अ-एससी
ब-ओबीसी महिला
क-सर्वसाधारण महिला,
ड-सर्वसाधारण
रहिवाशांना घ्यावे लागते विकतचे पाणी
मराठवाडा व राज्यातील इतर भागांतून कामासाठी आलेले कुटुंब येथील रहिवाशी झाले आहे. हाऊसिंग सोसायटी, बैठे घरे, गावठाण, अनधिकृत बांधकामे असा दाट लोकवस्तीचा हा प्रभाग आहे. सर्वसामान्य, कामगार, मध्यमवर्गीय असा मतदार वर्ग आहे. अनधिकृत बांधकामे मोठ्या संख्येने झाल्याने नागरी सुविधांवर ताण पडत आहे. अंतर्गत रस्ते अरुंद, विक्रेते व दुकानदारांचे अतिक्रमण, बेशिस्तपणे लावलेली वाहने आदी कारणांमुळे वाहतूककोंडीची समस्या नित्याची झाली आहे. बीआरटी मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी होते. महापालिकाचा जुना दवाखाना बंद झाला आहे. नियमित स्वच्छतेअभावी जागोजागी कचरा साचलेला दिसतो. कमी दाबाने पाणी येत असल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागते. काही भागात ड्रेनेज तुंबण्यामुळे प्रकार घडत आहेत. मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. खेळांचे मैदान नसल्याचे गैरसोय होत आहे. पक्के रस्ते बनविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.