पिंपरी: अवकाळी पावसामुळे भाज्यांची आवक मंदावल्याने पिंपरीतील भाजी मंडईत रविवारी (दि. 8) जून रोजी फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली होती. फ्लॉवर, बिन्स 100 रुपये तर घेवडा 180 रुपये किलो दराने विक्री केला जात आहे. तर पालेभाज्यांची विक्री 30 रुपये प्रतिजुडी दराने केली जात आहे.
कांदा, लसूण, बटाटे या भाज्यांचे दर स्थिर आहेत. लसूण 80 - 100 रुपये किलो तर कांदा आणि बटाट्याचे दर शंभर रुपयास चार किलो याप्रमाणे होते. टोमॅटो 25 रुपये प्रतिकिलो होते. आले 80 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. (Latest Pimpri News)
फळभाज्यांचे दर वाढले आहेत. रविवारी बाजारात गवार (गावरान व सुरती) 100 - 120 रुपये प्रतिकिलो होती. शेवगा 100 - 120 रुपये किलो होता. टोमॅटो 30 - 40 रुपये, भेंडी 80 - 100 रुपये किलो, फ्लॉवर 70 - 80 रुपये, कोबी 40 रुपये, मिरची 40 - 50 रुपये, गाजर 50 रुपये, शिमला 80 - 100 रुपये, लसूण 80 - 100 रुपये, आले 60 रुपये, वांगी 60 - 70 रुपये, काकडी 60 रुपये, कारले 70 - 80, कांदे 100 रुपये 5 किलो, बटाटा 35 रुपये किलो, बिन्स 120 - 150 रुपये किलो, घेवडा 180 रुपये किलो, रताळी 60 रुपये, लाल भोपळा 50 रुपये , घोसाळी 60, लिंबू 150 रुपये, दोडका 100 - 120 रुपये, बिन्स 120 रुपये किलो, तोंडली 80 रुपये, आवळा 100, बीट 40 रुपये, दुधी 60, पापडी 100 - 150.
पिंपरी बाजारातील दर
पाले भाज्यांचे दर (रुपयांत) प्रतिजुडी
कोथिंबीर 25 - 30 रुपये, मेथी 35 -40 रुपये, पालक 30 रुपये, शेपू 25 - 30 रुपये, पुदिना 15 रुपये, मुळा 15 रुपये, चवळई 20, लाल माठ 15, कांदापात 50 रुपये, अंबाडी 15 , करडई 20.
फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)
बीट 60, वाल 100, दोडका 150, कारली 100, भरताची वांगी 50, तोंडली 80 - 100, घोसळे 70, पडवळ 70, भोपळा 60, राजमा 100, पापडी 120, बीन्स 120 रुपये, परवल 60 ते 70, तोतापुरी 60 - 70 रुपये किलो, आवळा 60 रुपये किलो, रताळी 80 रुपये किलो, सुरण 100 रुपये, मद्रास काकडी 60 रुपये, घेवडा 180 रुपये, सिमला 120 रुपये, फ्लॉवर 100 रुपये, कोबी 40 - 50 रुपये.
मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)
कांदा 18, बटाटा 16, लसूण 70, आले 45, भेंडी 55, गवार 75, टोमॅटो 20, वाटाणा 100, घेवडा 75, दोडका 75, हिरवी मिरची 30, दुधी भोपळा 30, काकडी 30, कारली 55, गाजर 35, फ्लॉवर 80, कोबी 12, वांगी 35, ढोबळी 90, बीट 15, शेवगा 85 प्रतिकिलो दर होते.
मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)
फळभाजी 3681, पालेभाजी 38400 (गड्डी) , फळे आवक 346,
कांदा 360, बटाटा 639, आले 68, लसूण 0, भेंडी 118, गवार 26, टोमॅटो 662, वाटाणा 11, घेवडा 29, दोडका 23, हिरवी मिरची 204, दुधी भोपळा 30, काकडी 229, कारली 49, डांगर 125, गाजर 120, फ्लॉवर 221, कोबी 225, वांगी 158, ढोबळी 51, बीट 21 ,शेवगा 30, कैरी 30, चवळी शेंग 11, लिंबू 64, मका कणीस 98 क्विंटल, अशी एकूण 3681 क्विंटल आवक झाली.
पालेभाजी दर जुडी (रुपयांत)
कोथिंबीर 20रुपये, मेथी 25, पालक, 18 रूपये, शेपू 18 रुपये, कांदापात 15 रुपये, पुदिना 10 रुपये