Credit Card Fraud: क्रेडिट कार्डधारकांनो सावधान!

‘हेल्थ इन्शुरन्स’च्या नावाखाली सायबर फसवणुकीचा नवीन फंडा
Credit Card Fraud
क्रेडिट कार्डधारकांनो सावधान!File Photo
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी: क्रेडिट कार्डधारकांना ’तुमच्या कार्डवर हेल्थ इन्शुरन्स अ‍ॅक्टिव्ह झाला आहे, असे सांगून सायबर गुन्हेगार त्यांच्या मोबाईलमधील बँक अ‍ॅप्लिकेशनमध्ये सेटिंग बदलण्यास सांगतात. ग्राहकाने दिलेल्या परवानग्यांचा गैरवापर करून चोरटे मोबाईलवरचा संपूर्ण अ‍ॅक्सेस मिळवतात आणि कार्डवरून लाखोंची रक्कम उडवतात.

मोबाईलमध्ये बँक अ‍ॅप नसल्यास व्हॉट्स अ‍ॅपवर फसवी रज्ञि फाईल पाठवून फोन हॅक केला जातो. या नव्या प्रकाराच्या फसवणुकीबाबत पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी सावधतेचा इशारा दिला आहे. (Latest Pimpri News)

Credit Card Fraud
Moshi News: ...अखेर पाटीलनगर येथील रोहित्राचे स्थलांतर; वाहतूक कोंडीतून नागरिकांना मिळणार दिलासा

वाढत्या फसवणुकीचे स्वरूप

शहरांमध्ये अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रमाण वाढत असून, अनोळखी नंबरवरून कॉल करून स्वतःला हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा प्रतिनिधी म्हणवतात. तुमचा मोफत हेल्थ इन्शुरन्स अ‍ॅक्टिव्ह झाला आहे, असे सांगितले जाते. अटी वाचण्यासाठी तुमच्या बँक अ‍ॅपमध्ये सेटिंग अपडेट करावी लागेल. ग्राहक अ‍ॅप उघडतो तेव्हा स्क्रिन शेअरिंग, अ‍ॅप परवानग्या देण्यास भाग पाडले जाते. परवानगी मिळाल्यावर सायबर गुन्हेगार मोबाईलवर नियंत्रण मिळवून फसवणूक करतात.

स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर

सायबर गुन्हेगार वापरत असलेले अ‍ॅप्स हे स्क्रीन रेकॉर्डिंग, की-बोर्ड ट्रॅकिंग, जढझ मिळवणे, बँकिंग व्यवहार निरीक्षण करण्यास सक्षम असतात. जढझ प्राप्त होताच, फसवणूक सहज केली जाते. ग्राहकाच्या लक्षात यायच्या आतच त्याच्या खात्यातील रक्कम किंवा क्रेडिट कार्डवरून मोठे व्यवहार केले जातात.

रज्ञि फाईलद्वारे मोबाईलवर मालवेयरचा शिरकाव

मोबाईलमध्ये बँक अ‍ॅप नसेल, तर चोरटे व्हॉट्सअ‍ॅपवर रज्ञि फाईल पाठवतात. ती इन्स्टॉल होताच फोनमध्ये मालवेयर बसवला जातो. त्यामुळे बँक व्यवहार, संपर्क क्रमांक, फोटो, पासवर्ड आदी संवेदनशील माहिती चोरट्यांच्या सहज ताब्यात जाते.

फसवणूक झाल्यास काय करावे?

फसवणूक झाल्यास तातडीने 1930 हेल्पलाइनवर कॉल करावा किंवा ुुु. लूलशीलीळाश. र्सेीं. ळप या पोर्टलवर तक्रार नोंदवावी. वेळेवर तक्रार केल्यास रक्कम वाचवण्याची शक्यता असते. त्यामुळे संकोच न करता त्वरित कृती करणे अत्यावश्यक आहे.

Credit Card Fraud
Pimpri Crime: बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज; ठगास अटक

मोबाईलवर ताबा मिळवण्याचे नवे तंत्र

सायबर गुन्हेगार आता पारंपरिक माहिती मागण्याऐवजी थेट मोबाईलचा ताबा घेण्याचे तंत्र वापरत आहेत. त्यामुळे मोबाईल, व्हॉट्स अ‍ॅप, ई-मेल किंवा एसएमएसद्वारे आलेल्या कोणत्याही फाईल्स, लिंक्स, कॉलवर विश्वास ठेवण्याआधी सखोल शहानिशा करणे गरजेचे आहे. जागरूकतेशिवाय संरक्षण नाही, हे प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवावे.

कोणत्याही अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका. बँक किंवा इन्शुरन्स कंपन्या कधीही मोबाईल अ‍ॅपमध्ये सेटिंग बदलण्यास सांगत नाहीत. रज्ञि फाईल्स अत्यंत धोकादायक असतात. नागरिकांनी अँटीव्हायरस वापरावा आणि अनोळखी अ‍ॅप्स इन्स्टॉल करू नयेत.

रविवकिरण नाळे, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news