Alphonso Mango Price Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Fruit Market Mango Price: अक्षयतृतीयेला पिंपरीत आंब्यांची रेलचेल; महागाईमुळे मागणी कमी

कलिंगड-खरबूजांना वाढती पसंती; उन्हाचा बाजारावर प्रभाव

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी फळबाजारात अक्षयतृतीया असल्याने फळविक्रेत्यांकडे इतर फळांपेक्षा आंब्यांची जास्त आवक दिसत होती. हापूस आंब्याचे भाव जादा असल्याने मागणी कमी होती. उन्हामुळे कलिंगड आणि टरबूजाला पसंती आहे.

यंदा आंब्यांची आवक कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे आंब्याचे दर देखील वाढले आहेत. हापूस आंबा 1200 ते 1400 रुपये डझन दराने विक्री केली जात आहे. बदाम आंबा 200 रूपये किलो, केशर 300 रुपये, लालबाग 300 रुपये किलो, कर्नाटक हापूस 300 रुपये किलो असा दर आहे. बदाम, लालबाग आंबे हे स्वस्त असल्याने ग््रााहकांची लालबाग व बदाम आंब्यांना मागणी आहे. तसेच उन्हामुळे कलिंगड आणि खरबूजांची मोठ्या प्रमाणात आवक आहे. डाळिंब देखील 180 रुपये किलो दराने उपलब्ध आहेत.

फळांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे:

सफरचंद 280 - 350 रुपये, मोसंबी 100 - 120, संत्री 160 - 250, डाळिंब 150 - 300, पेरू 50 - 120 रूपये, अंजीर 100 रुपये , पपई 50 रूपये, दाक्षे 100 रुपये, कलिंगड 20 - 25 रुपये, केळी 40 - 50 रुपये, खरबूज 100 रूपये 3 नग, अननस 100 प्रतिनग, पिअर 200 रुपये, ड्रॅगनफुट पांढरे 120 रुपये, किवी 100, चिकू 80 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT