Winter Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Winter: पिंपरी-चिंचवडमध्ये थंडीची चाहूल; पहाटेचा पारा १८ अंशांवर

सकाळी धुके, संध्याकाळी गारठा; स्वेटर, जॅकेट खरेदीसाठी बाजारात गर्दी, चहा आणि गरम पदार्थांनाही मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: दिवाळी संपता संपता शहरात थंडीची चाहूल लागली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पहाटे आणि रात्री गारठा जाणवू लागला आहे. शहरात शनिवार (दि. १४) पहाटे शहरातील किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. दुपारी कमाल तापमान ३२ अंशाच्या आसपास नोंदवले गेले.

सकाळी धुके, संध्याकाळी गारठा

गेल्या काही दिवसांपासून सकाळी ६ ते ८ च्या दरम्यान हलके धुके आणि झोंबणारा गार वारा जाणवत आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वॉकला जाणारे आता टी-शर्टवर जॅकेट घालून येत आहेत. चहा टपऱ्यांवरही सकाळी गर्दी वाढली आहे. तळेगाव, लोणावळा, वडगावकडे तर थंडी अजूनच जास्त जाणवते. मावळ परिसरात पहाटे दव पडायला सुरुवात झाली आहे.

ऊबदार कपडे खरेदीसाठी गर्दी

थंडीची चाहूल लागताच बाजारातही बदल दिसू लागला आहे. स्वेटर, जॅकेट, टोप्या, मफलर, ब्लँकेटच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. पदपथांवरही ऊबदार कपडे विक्रेत्यांनी दुकाने लावल्याचे दिसून येत आहे; तसेच शरीराला थोडा ऊबदारपणा मिळविण्यासाठी गरम भजी, वडा-पाव, चहा, कॉफी, गरम दूध इत्यादी पदार्थांना मागणी वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT