पिंपरी-चिंचवड वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची दक्षिणआफ्रिकी शिष्टमंडळाकडून पाहणी Pudhari
पिंपरी चिंचवड

Waste To Energy: पिंपरी-चिंचवड वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची दक्षिणआफ्रिकी शिष्टमंडळाकडून पाहणी

शिष्टमंडळाने कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती, पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे कौतुक केले; पिंपरी-चिंचवडचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळले

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपो येथील कचऱ्यापासून वेस्ट टू एनर्जी प्रकल्पास पश्चिम आफ्रिकी देशांतील शिष्टमंडळाने भेट देत प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. या पर्यावरणपूरक प्रकल्पांचे शिष्टमंडळाने कौतुक केले. (Latest Pimpri chinchwad News)

ग्लोबल ग्रीन ग्रोथ इन्स्टिट्यूट (जीजीजीआय) यांच्या पश्चिम आफ्रिका सिटीवाइड इन्क्लुझिव्ह सॅनिटेशन प्रकल्पांतर्गत आणि सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन तसेच, सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने या दौर्याचे आयोजन करण्यात आले. पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल, बुर्किना फासो आणि कोट द आयव्हरी या देशांतील शिष्टमंडळाने प्रकल्पाची पाहणी केली.

ते देश हवामान सक्षमताद्वारे सर्वसमावेशक शहरी स्वच्छता प्रोत्साहन हा प्रकल्प राबवत आहेत. त्यासाठी महापालिकेच्या यशस्वी उपक्रमांचा अभ्यास करून, स्थानिक प्रशासनांमध्ये त्या अनुभवांचा उपयोग करण्याचा हेतू या भेटीमागे होता. शिष्टमंडळात मन्सूर फॉल, जेरोम फाख्री, सिदी का, ज्युलिएन तिअंद्रेबेओगो, उस्सेनी ओउएद्राओगो, अद्जुआ हेलेन ब्रागोरी एप्से योकोली, डायनाबा फाये, मेरी क्रिस्टिन एमी सेंट फाये यांचा समावेश होता.

कचऱ्याचे व्यवस्थापन, ऊर्जा निर्मिती प्रक्रिया, सांडपाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान व पुनर्वापर उपक्रमांबाबत तसेच, मोशी येथील घनकचरा स्थानांतरण केंद्र, प्लास्टिक कचर्यापासून इंधन निर्मिती प्रकल्प, बांधकाम राडारोडा गोळा करून प्रक्रिया करण्याचा प्रकल्प, बायो मेडिकल वेस्ट प्लांट, मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी, हॉटेल वेस्ट-टू-बायोगॅस प्रकल्प, बायोमायनिंग प्रकल्प, मेकॅनिकल कंपोस्टिंग प्रकल्प आणि इतर पर्यावरणपूरक प्रकल्पांविषयी सविस्तर माहिती शिष्टमंडळास देण्यात आली. तसेच, महापालिकेचे उपअभियंता योगेश आल्हाट, कनिष्ठ अभियंता दशरथ वाघोले, सल्लागार स्वरूप लगारे व प्रकल्प प्रमुख अशोक गुप्ता, दौर्याचे समन्वयन सीईपीटी विद्यापीठाच्या ओमकार काणे व गौतमी सायमवार उपस्थित होते.

या संदर्भात मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले की, महापालिकेने स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकास या क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. जागतिक स्तरावर या उपक्रमांची दखल घेतली जात असल्याचा आम्हाला अभिमान आहे. हा दौरा दोन्ही बाजूंनी अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणणारा ठरला आहे.

पिंपरी-चिंचवडचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशाव

महापालिकेचे कचरा व्यवस्थापन, ऊर्जा निर्मिती, शून्य कचरा प्रकल्प यांसारखे विविध पर्यावरणपूरक उपक्रम जागतिक स्तरावर आदर्श ठरत आहेत. या उपक्रमांची दखल आफ्रिकी देशांनी घेतल्याने पिंपरी चिंचवड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उज्ज्वल झाले आहे, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT