Ganeshotsav Traffic Diversion Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Traffic Changes: विसर्जनासाठी शहरातील वाहतुकीत बदल; विविध मार्गांवर प्रवेशबंदी

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी विविध मार्गांवर तात्पुरते बदल केले आहेत. २५ सप्टेंबर रोजी भोसरी, वाकड, निगडी, हिंजवडी आणि पिंपरी वाहतूक विभागातील काही प्रमुख रस्ते आणि चौकांवर वाहनांना प्रवेशबंदी राहणार असून, पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

भोसरी परिसर

सकाळी ७ ते रात्री ८ जायका चहा भोसरी येथून भोसरी ब्रिजखाली येणाऱ्या पीएमपीएमएल बसेसला मनाई राहील. ही वाहने पांजरपोळ चौकमार्गे अलंकारपूरम चौकाकडे वळविण्यात येतील. पीसीएमटी चौकातून येणाऱ्या बसेसना लांडेवाडी चौक-बापर पेट्रोल पंपमार्गे पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.

वाकड परिसर

दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत दत्त मंदिर रोडकडे जाणाऱ्या वाहनांना आंबामास साठे चौकातून प्रवेशबंदी राहील. ही वाहने कावेरीनगर किंवा काळाखडक चौकमार्गे पुढे जाऊ शकतील. वाकड चौकातून दत्त मंदिर रोडकडे जाणारी वाहतूक कस्पटे कॉर्नरमार्गे वळविण्यात येईल. उत्कर्ष चौकाकडून दत्त मंदिर रोडकडे जाणाऱ्या वाहनांनाही मनाई राहील. पोलरिस हॉस्पिटल चौक, दत्त मंदिर रोड, स्मार्ट चौक परिसरातील वाहतूक वळविण्यात येणार आहे.

निगडी परिसर

दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत अहिंसा चौक ते चापेकर चौक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. वाहनांना अहिंसा चौक- एस.के.एफ. चौक-जकातमाळा-दक्षिणनगर चौक-मुंबई-पुणे महामार्ग असा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. दक्षिणनगर ब्रिज, वाल्हेकरवाडी टी जंक्शन, लिंक रोड, भाई आळी, गांधी पेठ, चिंतामणी चौक आणि रिंगरूट चौकातून चापेकर चौकाकडे येणारी वाहतूकही पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहे.

हिंजवडी परिसर

दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत माणगाव, विप्रो सर्कल फेज-३ परिसरातून जॉमेट्रिक सर्कल चौकमार्गे मेगा व शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना मनाई राहील. ही वाहने जॉमेट्रिक सर्कल चौक-टाटा टी जंक्शन-लक्ष्मी चौकमार्गे वळविण्यात येतील. मेगा ९ चौक, सायरेवस्ती, इंडियन ऑइल चौक, वाकड नाका आणि कस्तुरी चौक परिसरातून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या वाहतुकीतही बदल करण्यात आला असून, विनोदेवस्ती, लक्ष्मी चौक आणि टाटा टी जंक्शनमार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत.

पिंपरी परिसर

दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत पवननगर मंदिर ते सर्जा हॉटेल मार्गावरील वाहतुकीला प्रवेशबंदी राहील. काळेवाडी पूल ते डिलक्स चौक, कराची चौक आणि रिव्हर रोडकडे जाणाऱ्या वाहनांना मनाई राहील. पिंपरी पूल ते शगुन चौक, कराची चौक,

आर्य समाज चौक आणि साई चौकाकडे जाणाऱ्या वाहतुकीलाही मुख्य मिरवणुकीच्या वेळी प्रवेशबंदी करण्यात येणार असून, वाहने भाटनगरमार्गे वळविण्यात येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT