voter mapping 
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Voter Verification: पिंपरी-चिंचवडमध्ये मतदार पडताळणीला मंद प्रतिसाद; एसआयआर मोहिमेतील ७ दिवसांचे आव्हान

पिंपरीत ६५ टक्के, चिंचवडमध्ये ४५ टक्के तर भोसरीत ५० टक्के काम पूर्ण; बीएलओंच्या कार्यपद्धतीवर नागरिकांच्या तक्रारी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) या मतदार पडताळणी मोहिमेत शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांतील सर्व पात्र मतदारांनी नोंदणी केली जात आहे. मात्र, हे प्रमाण खूपच कमी असून, उर्वरित सात दिवसांत सर्व मतदारांची पडताळणी होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभरात ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत बीएलओंकडून मतदारांकडून गणना अर्ज भरून घेतला जात आहे. अर्ज वेळेत भरून सादर करणार्‍या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येत आहे. प्रारूप यादी 17 ऑगस्टला प्रसिद्ध केली जााणार आहे.

मात्र, बीएलओकडून घरोघरी जाऊन अर्ज भरून घेतले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. नगरसेवक किंवा राजकीय पदाधिकार्‍यांच्या संपर्क कार्यालयात बसून बीएलओंकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. मतदान केंद्रात गेल्यानंतर बीएलओ नाहीत. मनुष्यबळ अपुरे आहे, अशी कारणे दिली जात आहेत. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. पावसात त्यांना बीएलओचा शोध घ्यावा लागत आहे. तसेच, नागरिकांमध्ये मतदार यादी नाव पडताळणीसाठी उत्साह नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकही नाव पडताळणीसाठी उदासीन असल्याचे चित्र आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत एकूण 65 टक्के मतदारांची नोंदणी झाली आहे. चिंचवड मतदारसंघात 45 टक्के काम झाले आहे. तर, भोसरी मतदारसंघात 50 टक्के नोंदणी पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित सात दिवसांत मोठ्या संख्येने शिल्लक असलेल्या मतदारांची पडताळणी करण्याचे काम पूर्ण करण्याचे आव्हान बीएलओंसमोर आहे.

दरम्यान, पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रारूप यादी 17 ऑगस्टला प्रसिद्ध केली जााणार आहे. त्यावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

नवीन मतदारांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरावा

पात्र मतदारांची नावे समाविष्ट झालेली नसतील किंवा नव्याने मतदार म्हणून नोंदणी करावयाची असल्यास त्यांना 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या कालावधीत नमुना क्रमांक सहा भरून अर्ज करता येणार आहे. मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्रमांक आठ, तर चुकीच्या किंवा अपात्र नोंदी वगळण्यासाठी नमुना क्रमांक सात सादर करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT