Pimpri Chinchwad Public Toilets Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Public Toilets: पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था; कॅप्सूल युरिनल्समधून दुर्गंधी

दरवाजे तुटले, नळ गायब, पाण्याचीही सुविधा नाही; स्वच्छतागृहांची तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या फायबर-रिनफोर्सड प्लास्टिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. देखभाल दुरुस्तीअभावी ही कॅप्सूल युरिनल्स अस्वच्छ अवस्थेत आहेत. नियमित स्वच्छतेअभावी दुर्गंधी पसरुन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागरिकांच्या स्वच्छतेसाठी महिला व पुरुष असे स्वतंत्र कॅप्सूल युरिनल्स शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला उभारण्यात आले होते. त्या स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटले आहेत. दरवाजे नसल्याने नागरिकांकडून वापर ही टाळला जात आहे. या दुरवस्थेचा त्रास स्थानिक नागरिक, महिला व पादचार्‍यांना सहन करावा लागत आहे.

या स्वच्छतागृहांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय, अस्वच्छ व धोकादायक झाली आहे. स्वच्छतागृहाचे दरवाजे, भांडे तुटलेले आहेत. गुटखा, पान, तंबाखू खाऊन थुंकल्याने परिसरात अस्वच्छता झाली आहे. पाण्याची सुविधा नसल्याने नागरिकांची मोठी गैरसुविधा होत आहे.

बेसिनमधील नळ ही गायब असल्याने हात धुता येत नाहीत. स्वच्छतागृहासमोर वाहतुकीसाठी मोठा रस्ता आहे. या रस्त्यावर कायम वाहनांची वर्दळ व नागरिकांची ये- जा असते. समोरच्या बाजूला शाळा आहे. तेथे कायम गर्दी असते. परिसरातील व्यापार्‍यांनाही स्वच्छतागृहाती कोणतीही व्यवस्था नाही. स्वच्छतागृहास दरवाजे नसल्याने नागरिकांची कुचंबना होत आहे. महापालिकडून नियमित स्वच्छता, पुरेसा पाणीपुरवठा, दरवाज्याची दुरस्ती अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांसाठी चांगले स्वच्छतागृह असावेत

एकीकडे स्मार्ट सिटी म्हणायचे, तर दुसरीकडे नागरिकांसाठी साधे सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. ही खरोखर शोकांतिका आहे. स्वच्छतागृहात पाणी नाही, दिवे नाहीत. मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. स्वच्छतागृहात जाणे ही धोकादायक वाटते. अस्वच्छतेमुळे आजार पसरण्याचा धोका आहे. महापालिकेने सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी पुढाकार घेऊन सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे, असे सामाजिक कार्यकते माधव नेर्लेकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT