Pimpri Chinchwad International Film Festival Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad International Film Festival: पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; ‘मलवाझी’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

‘अ स्टोरी कार्वेड ऑन अ ट्री’ लघुपटाला प्रथम पुरस्कार; 43 देशांतील 116 हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केरळ राज्यातील मल्याळम भाषेतील ‌‘मलवाझी‌’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावला. मराठी भाषेतील अ स्टोरी कार्वेड ऑन अ ट्री या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार पटकावला. ॲनिमेशन विभागात राजस्थान येथील द वेट वॉल या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन फिल्मचा मान मिळवला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दुलाल रॉय व प्रणव जोशी यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिथिला हिरेमठ यांना प्रदान करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या साबर बोंड या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहण कानवडे यांना सिने आयकॉन पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. महोत्सवात भारतासह जर्मनी, इटली, स्पेन, पोलंड, बाझिल, युएई यासह 43 देशांमधील 116 पेक्षा अधिक चित्रपट, लघुपट, माहितीपट, ॲनिमेशन चित्रपट व 60 सेकंदांचे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने महोत्सव आकुर्डी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात पुरस्कार वितरण समारंभ झाला. या वेळी उपमहापौर शर्मिला बाबर, क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, नगरसेविका प्रियंका कुदळे, उपायुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, चित्रपट निर्माते नितीन वैद्य, अभिनेते श्रीकांत यादव, दिग्दर्शक तेजस देऊसकर, अभिनेते इनाम उल हक, दिग्दर्शक रोहन कानवडे, गोरख कातोरे, सोमनाथ शितोळे, डॉ. पांडुरंग भोसले, चित्रपट समीक्षक नरेंद्र बंडाबे, श्रीकांत आगवणे, मोदीत सिंघल, पल्लवी सिंघल आदी उपस्थित होते. चैतन्य कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. महोत्सवात क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम या चित्रपटाला नागरिकांचा प्रतिसाद लाभला.

विभागनिहाय प्रमुख विजेते

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट - मलवाझी (केरळ), सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन फिल्म - द वेट वॉल (राजस्थान),

  • सर्वोत्कृष्ट माहितीपट - ओस्लो (महाराष्ट्र),

  • सर्वोत्कृष्ट 60 सेकंद चित्रपट : अ हाफ ऑफ हाफ हार्टेड (बाझिल).

  • सर्वोत्कृष्ट लघुपट (प्रथम) अ स्टोरी कार्वेड ऑन अ ट्री (महाराष्ट्र).

  • सर्वोत्कृष्ट लघुपट (द्वितीय) - द व्हॉइस ऑफ ओल्ड (महाराष्ट्र).

  • सर्वोत्कृष्ट लघुपट (तृतीय) - द अलटर इको (पश्चिम बंगाल).

  • वैयक्तिक पुरस्कार : सर्वोत्कृष्ट अभिनेता - दुलाल रॉय (मरत्या) , प्रणव जोशी.

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मिथिला हिरेमठ (महाराष्ट्र).

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - साईनाथ गाणुवाड (अ स्टोरी कार्वेड ऑन अ ट्री).

  • सर्वोत्कृष्ट पटकथा - साईनाथ गाणुवाड (अ स्टोरी कार्वेड ऑन अ ट्री).

  • सर्वोत्कृष्ट निर्मिती रचना - नेहा काणेकर (केकी).

  • सर्वोत्कृष्ट ध्वनी -अनिश बासू (द आल्टर इको).

  • सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - प्रथमेश रांगोळे (केकी).

  • सर्वोत्कृष्ट संपादन - जागेश्वर दाभोळे (केकी).

  • ज्यूरी पुरस्कार (चित्रपट विभाग) : बेस्ट फीचर फिल्म - मारिया,

  • बेस्ट डेब्यू डायरेक्टर - शेनेस.

  • सर्वोत्कृष्ट ज्यूरी पुरस्कार : लॉस्ट साँग ऑफ सुंदरी (माहितीपट - महाराष्ट्र), फिन (लघुपट, स्पेन), चक्री (महाराष्ट्रड).

  • विशेष नामांकने : ऑडियन्स चॉईस अवॉर्ड - अलमारी का आचार (लघुपट- दिल्ली),

  • व्हिजन अवॉर्ड - अनिकेत फरांदे (दार).

  • सर्वोत्कृष्ट गीत : प्रथम - गणपती तू सर्वश्रेष्ठ, द्वितीय - मिस्ड डे, तृतीय - हायड्रोजन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT