Pimpri Chinchwad HSC Exam Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad HSC Exam: बारावीची परीक्षा सुरू; ३५ केंद्रांवर तयारी पूर्ण

३३,७३३ विद्यार्थी प्रविष्ठ; सीसीटीव्हीद्वारे कॉपिमुक्त परीक्षेवर भर

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीच्या परीक्षेला मंगळवार (दि. 10) पासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांमध्ये एकूण 35 केंद्रांवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यंदा शहरातून परीक्षेसाठी 33 हजार 733 विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत.

परीक्षा केंद्रांवर कुठेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर शिक्षकांकडून आसन व्यवस्थेवर आणि फलकांवर बैठक क्रमांक टाकण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. बैठक क्रमांकाची माहिती घेण्यासाठी परीक्षार्थींनी सोमवार (दि. 9) केंद्रांवर गर्दी केली होती. कॉपिमुक्त अभियान फेबुवारी 2026 च्या अनुषंगाने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता बारावी व दहावी बोर्ड परीक्षा कॉपिमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन व शिक्षण मंडळ यांच्याकडून काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या सूचनानुसारे पिंपरी-चिंचवड महापालिका माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा कॉपिमुक्त, भयमुक्त अन निकोप वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी उपआयुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर केद्रांध्यक्षांना प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT