Navratri Flower Demand Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Flower Market: नवरात्रोत्सवामुळे फुलबाजारात तेजी; झेंडूच्या फुलांना मागणी, तिळाच्या फुलांचीही आवक

पिंपरी-चिंचवडच्या बाजारात पिवळा, केशरी गोंडा दाखल; घटाच्या पूजेसाठी तिळाच्या फुलांना पसंती, निशिगंधा ६०० रुपये किलो

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्याने फुलबाजारात झेंडूच्या फुलांना मागणी वाढली आहे. बाजारात देशी पिवळा गोंडा (झेंडू) आणि केशरी कलकत्ता (गोंडा) यांची मोठी आवक झाली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड फुलबाजार आडते संघ राजकुमार मोरे यांनी दिली.

सध्या फुलांची मागणी वाढल्याने फुल बाजारात तेजी आहे. नवरात्रोत्सवामध्ये घराघरांमध्ये आणि मंडळांमध्ये पूजा अनेकविध धार्मिक कार्यक्रम असतात. फुलबाजारात विड्याची पाने, तुळशीची पाने, कमळाची फुले, झेंडू, शेवंती, बिजलीची फुले यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे.

घाऊक बाजारात पिवळा गोंडा ६० - ७०, पिवळा कलकत्ता गोंडा ७० रुपये किलो, केशरी गोंडा ४० रुपये, केशरी कलकत्ता ६० रुपये किलो, तुळजापुरी गोंडा ६० रुपये किलो दर होता. शेवंती १५० रुपये, जांभळी शेवंती १०० रुपये, कबूतर शेवंती २०० रुपये, अष्टर १०० रुपयांना ३ जुड्या, लाल गुलाब तुकडा १५० रुपये किलो, कलर गुलाब तुकडा १०० रुपये, डच गुलाब १०० ते १२० रुपये किलो. तिळाची फुल १०० - २०० वाटा, कमळ १० रुपये, निशिगंधा ६०० रुपये किलोने विक्री केली जात आहे.

घटाच्या माळेसाठी तिळाच्या फुलांची आवक

शहरातील बाजारपेठेत नवरात्रीमधील घटाच्या पूजेसाठी लागणाऱ्या तिळाच्या फुलांची आवक सुरू झाली आहे. पिंपरी भाजी मंडई, कासारवाडी आणि भोसरी येथील फुल बाजारात सोलापूर, लातूर आणि सातारा जिल्ह्यातून तिळाची फुलांची आवक होते.

पिवळ्या रंगाची, घंटेच्या आकाराची ही नाजूक फुले दिसायला अतिशय सुंदर असतात. देवीच्या घटावर, माळेसाठी या फुलांचा वापर केला जातो. व्यापाऱ्यांच्या मते, नवरात्रीमध्ये झेंडू आणि गुलाबाच्या तुलनेत तिळाची फुलांना जास्त मागणी असते. नवरात्रीमध्ये तिळाच्या फुलांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT