Pimpri Chinchwad Child hand stuck in Elevator door  Pudhari
पिंपरी चिंचवड

Dighi News | सावधान ! लिफ्टमध्ये मुलांकडे दुर्लक्ष पडेल महागात: चिमुकलीचा हात दरवाजाच्या सापटीत अडकला; CCTV समोर

Pimpri Chinchwad Elevator Accident | पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरातील गृहनिर्माण सोसायटीतील घटना

पुढारी वृत्तसेवा

Dighi Child hand stuck in Elevator door

पिंपरी चिंचवड: लिफ्टचा वापर करताना लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत गाफील राहणे किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात आला आहे. एका गृहनिर्माण सोसायटीत लिफ्टच्या दरवाजाच्या सापटीत चिमुकलीचा हात अडकल्याची थरारक घटना घडली. सुदैवाने, काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर हात सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

दिघीतील एका सोसायटीत ही घटना घडली. एक महिला आपल्या काही महिन्यांच्या चिमुकलीसह लिफ्टमधून जात होती. लिफ्ट इच्छित मजल्यावर थांबल्यानंतर दरवाजा उघडला आणि पुन्हा बंद होऊ लागला. यावेळी चिमुकलीने सहज आपला हात दरवाजावर ठेवला होता, जो दरवाजा बंद होताना सापटीत अडकला.

हा प्रकार लक्षात येताच लिफ्टमधील महिलेसह उपस्थित नागरिक भयभीत झाले. चिमुकली वेदनेने रडत असतानाच तिला वाचवण्यासाठी तात्काळ प्रयत्न सुरू झाले. काही मिनिटांच्या धडपडीनंतर तिचा हात बाहेर काढण्यात आला आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेचा सर्व प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे लिफ्ट वापरताना विशेषतः लहान मुलांबाबत कमालीची सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT