Dengue Cases Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Dengue Cases: थंडी सुरू, तरी डासांचा डंख कायम! पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचे ३३ रुग्ण पॉझिटिव्ह

नोव्हेंबरमध्ये ८९४ संशयितांची तपासणी; मलेरियाचा एक रुग्ण आढळला, चिकनगुनिया आणि झिकाचा एकही रुग्ण नाही

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: थंडी सुरू झाली तरी पिंपरी-चिंचवडमध्ये डासांमुळे उद्भवणाऱ्या आजारांचा धोका अजूनही कायम आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या नोव्हेंबर महिन्याच्या अहवालामध्ये शहरात डेंग्यूच्या संशयित ८९४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी डेंग्यूचे ३३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

त्याचबरोबर मलेरियासाठीही रूग्णांची तपासणी करण्यात आली. नोव्हेंबरमध्ये ताप आलेल्या १६,७४२ रुग्णांची मलेरियासाठी रक्त तपासणी करण्यात आली. त्यामध्ये फक्त १ रुग्ण मलेरिया पॉझिटिव्ह आढळला आहे.

चिकनगुनिया आणि झिका या आजारांबाबत मात्र, नोव्हेंबर महिना पूर्णपणे सुरक्षित राहिला. या महिन्यात चिकनगुनियाचा एकही संशयित किंवा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. त्याचप्रमाणे झिकाचाही एकही रुग्ण आढळला नाही.

नोव्हेंबरमध्ये थंडी वाढली असली तरी दिवसभरातील तापमान डासांच्या वाढीसाठी पोषक आहे. घरात, गच्चीवर, कुंड्यांमध्ये, कुलरमध्ये, भंगारात साचलेले पाणी हेच डेंग्यूच्या डासांचे मुख्य ठिकाण आहे. त्यामुळे महापालिकेकडून घरोघरी जाऊन पाणी साचले आहे का, याची तपासणी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT