BRT Lane Encroachment Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri BRT Lane Encroachment: पिंपरीत बीआरटी मार्गिकेत खासगी वाहनांची घुसखोरी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पीएमपी बसचा वेग घटला; प्रवाशांचा प्रवास धोकादायक, कठोर कारवाईची नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी मार्गिकांत खासगी वाहनांची घुसखोरी होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम होत आहे. पीएमपीच्या बसगाडयासाठी राखीव असणाऱ्या मार्गिकेतून खासगी वाहने नेली जातात. त्यामुळे बीआरटी बस गाड्यांचा वेग कमी झाला असून प्रवाशांचा प्रवास धोकादायक बनला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसगाडयासाठी संयुक्त बीआरटी मार्गिका उभारण्यात आली आहे. मात्र शहारातील आंळदी, वाकड, भोसरी, निगडी तसेच काही परिसरातील बीआरटी मार्गातून चारचारी आणि दुचाकी वाहने सर्रासपणे नेली जातात. त्यामुळे बस चालवताना चालकांला तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण अनेक व्यापारी किंवा वाहन चालक आपल्या सोयीसाठी मार्गिकेत वाहने उभी करत आहेत. त्यामुळे अपघात देखील होऊ शकतो.

बीआरटी मार्गात घुसखोरी केल्यानतंर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वाहन परवाना रद्द , तसेच सीसीटीव्ही कॅमेरी बसविण्याचे विविध प्रयोग करण्यात आले होते; मात्र वाढलेली घुसखोरी लक्षात घेता, हा प्रयोग फसल्याचे वाढत्या घुसखोरी वरुन निर्देशनास येत आहे. त्यामुळे पीएमपी प्रवाशांना वेळत नोकरी व कामाच्या ठिकाणी नियोजीत ठिकाणी जाता येत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. बीआरटी मार्गिकांवरील अनधिकृत वाहनांवर टोइंग कारवाई, दंडासह कठोर शिक्षा, नियमित पोलिस गस्त, आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT