Water Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Water Tank Cleaning Contract: महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता; 2.24 कोटींच्या कामास मंजुरी

पिंपरी-चिंचवडमधील शाळा, दवाखाने व कार्यालयांतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या तीन वर्षांत शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छ होणार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळा, कार्यालये, दवाखाने या ठिकाणी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची शास्त्रोक्त पध्दतीने साफसफाई व स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी राजलक्ष्मी स्वयंरोजगार सेवा सहकारी या संस्थेला काम देण्यात आले आहे. या कामासाठी तीन वर्षांसाठी 2 कोटी 24 लाख 33 हजार रुपयांचा खर्च होणार आहे. त्याला स्थायी समितीकडून मान्यता देण्यात आली.

शहरामध्ये महापालिकेच्या प्राथमिक 105 व माध्यमिकच्या 18 शाळा आहेत. रुग्णालय, दवाखाने व क्षेत्रीय कार्यालये आहेत. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्याची स्वच्छता करण्यासाठी प्रशासनाने निविदाप्रक्रिया राबवली होती. त्यामध्ये 3 ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यापैकी एक ठेकेदार अपात्र झाल्याने दोन ठेकेदार या कामासाठी पात्र झाले.

त्यामध्ये राजलक्ष्मी स्वयंरोजगार संस्थेने 2 कोटी 36 लाख 13 हजार 785 निविदा रकमेवर 5 टक्के कमी 2 कोटी 24 लाख 33 हजार 96 रुपये इतका दर सादर केला. हा दर दुसऱ्या ठेकेदारापेक्षा कमी असल्याने संबंधित ठेकेदाराची नियुक्ती करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. टाक्याची स्वच्छता व्यवस्थित न झाल्यास किंवा दूषित पाणीपुरवठा झाल्यास संबंधित विभागावर कारवाई केली जावी, अशी सूचना समिती सदस्याकडून करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT